हेक्टर प्लस: भारतातील पहिल्या ६ सीटर इंटरनेट एसयूव्हीसोबत पॅनोरमिक सनप्रूफ आणि सुरुवातीच्या १३.४८ लाख रुपयांच्या किंमतीत

0
631

 

 

गोवा खबर: एमजी (मॉरीस गॅरेज) मोटर इंडियाने आज १३.४८ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरुवातीच्या मूल्यावर बहुप्रतीक्षित एमजी हेक्टर प्लस लाँच केली आहे. हेक्टर प्लस भारतातील पहिली ६ सीटर इंटरनेट एसयूव्ही असून ती पॅनोरमिक सनरूफसह येत आहे. तिची निर्मिती एमजी मोटरच्या गुजरात राज्यात वडोदऱ्याजवळील हलोल येथील अत्याधुनिक निर्मिती प्रकल्पात केले जाईल.

एमजी हेक्टर परिवारातील नवा सदस्य असलेल्या या ६ सीटर हेक्टर प्लसमध्ये मधल्या ओळीत उत्कृष्ट आणि आरामदायी कॅप्टन सीट्स देण्यात आल्या आहेत. ६-सीटर एसयूव्ही ही नव्या ड्युएल-टोन स्मोक्ड सेपिया ब्राउन इंटेरिअरमुळे आतून खूप अपिलिंग लूक देते. नव्या स्टायलिश हेडलँप्ससह, एक नवे क्रोम-स्टडेड फ्रंट ग्रिल आणि आय-स्मार्ट नेक्स्ट जनरेशनसाठी चिट-चॅट फीचर यामुळे गाडीचे आकर्षण वाढले आहे. यात आणखी आकर्षक सुविधा असून त्यात नवे स्मार्ट स्वाइप,  फ्रंट आणि रिअर बम्पर्स, न्यू रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिवाइज्ड स्किड प्लेट्स आहेत.

नेहमीच रोमांचक अनुभव देण्याचे तत्त्व पाळत, कार निर्मात्याने १३ ऑगस्टपर्यंत एका महिन्यासाठी सुरुवातीच्या किंमती निर्धारीत केल्या आहेत. सर्व नव्या हेक्टर प्लस एमजी डीलरशिप, www.mgmotor.co.in या वेबसाइटवर किंवा माय एमजी मोबाइल अॅपवरून बुक करता येतील. ट्रिम लेव्हलनुसार, किंमत ५०,००० रुपयांपर्यंत वाढवली जाईल.

एमजी हेक्टरप्रमाणेच एमजी मोटर इंडियाने ग्राहकांना हेक्टर प्लसच्या रिसेल व्हॅल्यूचे आश्वासन दिले आहे. यासाठी कारनिर्माता कंपनीने ‘कारदेखो’ सोबत करार केला आहे. कार खरेदी करणारे “3-60”योजनेअंतर्गत तीन वर्षांच्या मालकीनंतर एमजी हेक्टर प्लस ६०% च्या किंमतीत खरेदी करेल, जिला ग्राहक अधिक आकर्षक किंमतीत खरेदी करू शकतील.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा हे लाँचिंगप्रसंगी म्हणाले, “ आम्ही एमजी मोटरसह २०१९ मध्ये भारतीय वाहन बाजारात प्रवेश केला होता. भारतातील कारमालकांच्या आयुष्याला स्पर्श करण्याची आमची इच्छा आहे, जेणेकरून त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाशी जोडता येईल. एमजी हेक्ट्लसचे लाँचिंग हे आमच्या प्रवासातील एक नवे यश आहे. ती टॉप-नॉच प्रॉ़डक्ट आणि सुविधांसह ग्राहकांच्या सेवेत कटिबद्ध आहे. ६-सीटर इंटरनेट एसयूव्ही ही आमच्या सर्व ग्राहकांना एक उत्कृष्ट कौटुंबिक आनंदक्षण प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आधारीत उपलब्ध लक्झरी आणि कंफर्टचे मिश्रण आहे.”

एमजी हेक्टर प्लस आपल्या ग्राहकांना पुरेसा अनुभव प्रदान करण्यासाठी एमजी शील्ड आणि एमजी शील्ड+ प्रदान करते. एमजी शील्ड अंतर्गत, एमजी फ्री-तीन, ‘5एस’, म्हणजेच फ्री5-वर्ष/ अनलिमिटेड किमी वॉरंटी, फ्री 5-वर्षीय रोडसाइड असिस्टंस आणि पहिल्या 5 सर्व्हिससाठी फ्री लेबर चार्जचा विस्तार करण्यात आला आहे. ‘एमजी शील्ड’ अंतर्गत सर्व घटक एमजी ओनरशिपचा अनुभव वाढवणे तसेच एमजीच्या ग्राहकांना मन:शांती प्रदान करण्याच्या उद्देशाने दिलेले आहेत. ६-सीटर एसयूव्हीची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप(टीसीओ) या सेगमेंटमध्ये सर्वात कमी आहे. ही पेट्रोल व्हेरिएंटसाठी ४५ पैसे प्रति किलोमीटर आणि डिझेल व्हेरिएंटसाठी ६० पैसे प्रति किलोमीटर (१००,००० किलोमीटर वापराच्या आधारे करण्यात आलेली मोजणी) आहे. एमजी हेक्टर प्लस क्लासिक पॅकेजचा भाग म्हणून ३ वर्षांसाठी ८,००० रुपयांपासून सुरु होणाऱ्या सर्वात चांगल्या प्रीपेड मेंटेनन्स प्लॅन सादर करते.

ग्राहकांप्रति वचनबद्धतेच्या स्वरुपात, एमजीने आपल्या ‘शील्ड+’ या कॉन्टॅक्टलेस टेक्नोलॉजी सूटचा विस्तारही केला आहे. ‘कस्टमर कन्व्हिनियन्स’, ‘सॅनिटायझेशन’, ‘कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस’ आणि ‘इन्शुरन्स’ या ४ कॉर्नरस्टोनवर ही प्रणाली आधारलेली आहे. या प्रतिष्ठित कारनिर्मात्याने शील्ड+ मध्ये अनेक व्हॅल्यू अॅडेड फीचर्स समाविष्ट केले आहेत. उदा. डिजिटल शेड्यूलिंग आणि हेक्टरप्लसची ऑनलाइन बुकिंग, एमजीकेअर@होम, आणि ओव्हर-द-इयर अपडेट्स, इत्यादी. कंपनीने एमजी व्ही पीएचवाय सादर केले आहे, जे सोशल डिस्टन्सिंग ठेवत शोरुममध्ये उत्पादनांचे एक कॉन्टॅक्टलेस ऑडिओ गाइडेड फिचर डेमॉन्स्टेशन आहे. सुरक्षेचा आणखी एक थर जोडत, या कालावधीत वाहन बुक करणाऱ्या ग्राहकाला सेराफ्यूजन (CerafusionTM ) द्वारे जगातील सर्वोत्कृष्ट स्टरलायझेशन उपलब्ध करून दिले जाईल. जे ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबाला नैसर्गिक रुपाने कोणत्याही रसायनांशिवाय सुरक्षित ठेवू शकते.

एमजीने सामाजिक आणि आर्थिक रुपात दुर्बल वर्गातील मुलींच्या शिक्षणासाठी आयआयएमपीएसीटीसोबत सक्रिय करार केला आहे. हे दोघे मिळून भारतातील ५ राज्यांमध्ये १५ तंत्रज्ञान संचलित शिक्षण केंद्र विकसित करतील. प्रत्येक हेक्टर प्लस खरेदीतील एक भाग थेट या उपक्रमासाठी दिला जाईल. एमजीने यापूर्वी एमजी हेक्टरसाठीदेखील अशाच प्रकारचा उपक्रम राबवला होता. भारतातील ६०,००० पेक्षा जास्त मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले होते.