हॅमर्झ या गोव्यातील पहिल्या लक्झरी क्लबचे अनावरण

0
806
 गोवा खबर:क्लबिंग एक्स्पिरियन्स देण्यातील आघाडीचे नाव असलेल्या केएसपी क्लब्जने गोव्यातील पहिलावहिली लक्झरी क्लबचे अनावरण केले. हॅमर्झ असे या लक्झरी क्लबचे नाव आहे. आकर्षक अंतर्गत रचना, अत्याधुनिक ध्वनि व प्रकाश यंत्रणा, डीजे व्यवस्थेसह ऐसपैस डान्स फ्लोअर असलेल्या या लक्झरी नाइटकल्बमध्ये वैशिष्ट्यपूर्ण संगीताच्या तालावर नाचत वैविध्यपूर्ण कॉकटेल आणि अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्याची सुविधा आहे.
क्लबच्या उद्घाटनप्रसंगी केएसपी क्लब्जचे प्रमुख श्री. केतन एस. पटेल म्हणाले, “जगभरातील उत्तमोत्तम क्लबमधील स्टाइल, सोयीसुविधा, ईडीएम व हिप हॉस म्युझिकमधील निवडी याबाबत चांगल्या बाबींचा अनुभव घेत सर्वोत्तम क्लबिंग एक्स्पिरियन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर गोव्यात असा प्रिमिअम व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्लबिंग सुविधेची गोव्यात कमतरता होती आणि म्हणूनच भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात अशी सुविधा सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”
या क्लबचे अनोखेपण म्हणजे सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी नाइटलाइफचा अनुभव मिळण्यासाठी खास जागांचा विकास करण्यात आला आहे. ज्यांना मुक्तपणे नाच करण्याची आवड आहे त्यांना ऐसपैस अशा डान्स फ्लोअरवर उत्कृष्ट ध्वनी यंत्रणा, भव्य एलईडी स्क्रीन आणि आकर्षक प्रकाशयोजनेच्या सानिध्यात आपली आवड पूर्ण करता येणार आहे. ज्यांना आपल्या मित्रपरिवारासमवेत संस्मरणीय, आनंदी क्षण व्यतीत करावयाचे असतील त्यांना आउटडोअर सुविधेत संथ संगीतसुरांच्या वातावरणात गप्पा करायला मिळणार आहेत. तर डेकवर आपल्या प्रिय व्यक्तीसंगे किनाऱ्यावर व्यतीत केलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा देऊ शकतात.
ज्यांना विशेष अनुभवांचे क्षण घ्यावयाचे आहेत त्यांच्यासाठी खास व्हीआयपी स्पेसेस उपलब्ध करण्यात आल्या असून आपणास आवडेल ते संगीत ऐकता येणार आहे. ओपन टेरेसवर निसर्गाच्या सानिध्यात विहंगम नजारा पाहत आपल्या मित्रांसमवेत धूम्रपानाचाही आस्वाद घेता येणार आहे.
हा क्लब बागा खाडीच्या जवळच असल्याने व शेतांनी वेढला असल्याने उत्तर गोव्यातील गर्दीच्या गोगांटापासून दूर आहे. या क्लबमध्ये सर्वोच्च स्वच्छता व आरोग्यसुरक्षा निकषांचा अवलंब केला जातो. गोव्यातील नाइटक्लब क्षेत्राविषयी हल्लीच प्रकाशित झालेल्या श्वेतपत्रिकेनुसार, अनेक क्लबमध्ये अस्वच्छता व आरोग्यसुरक्षेबाबत काळजी घेतली जात नसल्याचे म्हटले आहे आणि अशा अस्वच्छपणामुळे या क्षेत्राची बदनामी होत आहे.
४ ऑक्टोबर २०१९ रोजी हॅमर्झ या लक्झरी क्लबचे औपचारिक उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी नेदरलँड्समध्ये प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक पॉप डीजे व निर्मात्यांची जोडी असलेले टीव्ही नॉइज, जगभराततील अनेक शहरांत लोकप्रिय ठरलेली अव्वल क्रमांकाचा डीजे ट्रेन्टिनो – सन टाइम्स आणि मुंबईतील प्रसिद्ध डीजे सुकेतू यांनी आपली अदाकारी सादर केली. त्यांच्या कौशल्याला बर्नहॅमच्या डीएमसी मुख्यालयात चारवेळा युके चॅम्पियन आणि दोनदा वर्ल्ड चॅम्पियनने गौरवण्यात आले आहे.