हुतात्मा स्मारकावर आज पुष्पांजली कार्यक्रम

0
688

गोवा खबर: ३० जानेवारी रोजी पणजीतील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहण्यात येईल. सकाळी १०.४० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होईल.

 राज्यपाल  सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे सभापती श्री. राजेश पाटणेकर व इतर मान्यवर हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्रे वाहतील. थोर हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.