हिमाचल प्रदेशात स्कूल बस दरीत कोसळून वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
885

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील नुरपूरमध्ये स्कूल बस दरीत कोसळल्याने वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. ही घडना काल संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली .

कांगडा जिल्हय़ातील नुरपूर येथे 60 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱया बसचा 200 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली . जखमी विद्यार्थ्यांना जवळच्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त केला असून या घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.