रामनाथी (गोवा) – देशातील 14 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, पद्मावत चित्रपट प्रसारित करणार नाही; पण प्रत्यक्षात चित्रपट प्रसिद्ध झाला. राणी पद्मावतीसह 16 सहस्र महिलांनी जोहार, म्हणजेच धर्मासाठी प्राणत्याग केला. आम्ही त्यांचे वंशज आज अस्तित्वात असतांनाही पद्मावती झालीच नाही, असा प्रचार करण्यात आला. आज वैचारिक क्रांतीची आवश्यकता आहे की, ज्यामुळे पुढची100 वर्षे कोणीही इतिहासाची मोडतोड करू शकणार नाही आणि पद्मावतसारखा दुसरा कोणताही चित्रपट पुन्हा होता कामा नये. आपण धर्मनिरपेक्ष न होता धर्मसापेक्ष व्हायला हवे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे वर्ष 2023 जवळच आहे. या 5 वर्षांच्या कालावधीत काय करायचे, याची दिशा ठरवून ते स्थापन करूया. त्यात आपण प्रत्येकाने स्वतःचा सहभाग द्यायला हवा. हिंदु जनजागृती समितीने आम्ही (श्री राजपूत करणी सेनेने)काय करायचे ?, याचा आदेश द्यावा. आम्ही सर्वजण, म्हणजेच श्री राजपूत करणी सेनेचे अधिकृत 9 लाख 94 सहस्र राजपूत कर्तव्य आणि धर्मकार्य म्हणून त्यात सहभागी होऊ. महाराणा प्रताप यांनी त्या काळी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला होता आणि तो संकल्प आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया, असे जाज्वल्य प्रतिपादन जोधपूर (राजस्थान) येथील श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्रसिंह कालवी यांनी केले.
ते रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थानमधील श्री विद्याधिराज सभागृहामध्ये आयोजिलेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये पद्मावत चित्रपटामध्ये झालेले इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी हिंदु समाजाचे संघटन या विषयावर बोलत होते. या वेळी सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी लोकेंद्रसिंह कालवी यांचा विशेष सन्मान केला.
युरोपमध्ये कोणतेही राष्ट्र निधर्मी नाही, तर प्रत्येक देशाचा एक स्वतंत्र धर्म आहे. युरोपमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही नसून चर्चच्या अंकीत असलेल्या शासकांचे राज्य आहे. तेथील न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था यांवरही चर्चच्या व्यवस्थेचा प्रभाव आहे. केवळ भारत असा देश आहे की, जो धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) लोकशाही असलेला आहे. भारतात लोकशाही असून कोणीही स्वतंत्र शासक नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान हे केवळ इंग्रज सोडून गेलेल्या आणि त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. लोकशाहीला जनतेचे राज्य म्हटले जात असले, तरी भारतात लोकशाहीत लोकांना केवळ मतदान करण्याचा अधिकार आहे, राज्य करण्याचा नाही. संविधानाच्या हिंदीतील अधिकृत कागदपत्रांत सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असा अर्थ नसून पंथनिरपेक्ष असा अर्थ आहे. त्यामुळे पंथनिरपेक्षता हटवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी.त्या स्थापनेच्या हेतूने धर्मनिष्ठ हिंदूंना संघटित करून भ्रष्ट आणि अत्याचारी यांना शासन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा.रामेश्वर मिश्र यांनी केले.
संगीत, नृत्य, नशा, चित्र, छायाचित्र, मूर्ती अशा गोष्टी इस्लाममध्ये प्रतिबंधित आहेत. इस्लाममध्ये निषिद्ध मानलेल्या गोष्टी करणार्यांना शरियत कायद्यानुसार कठोर शिक्षा आहेत. तरीही सलमान खान, आमीर खान आदी कलाकार चित्रपटांमध्ये काम करतात, मुसलमान राजकीय नेते दूरचित्रवाणीवर बोलतात ! छायाचित्र काढण्याला प्रतिबंध असल्याने, हे सर्व तर इस्लामचे उल्लंघनच करत आहेत. अशांना मुसलमान कसे म्हणता येईल ? हे तर छद्म मुसलमान आहेत. ते पैगंबरांच्या शिकवणीचा उपहास करत आहेत. इस्लामच्या नावाखाली स्वैराचाराचे लायसन्स म्हणून हे छद्म मुसलमान कार्यरत आहेत. आजचे मुसलमान स्वतःला कट्टरतावादी मानत असले आणि लहानसहान गोष्टींमुळे इस्लामचा अपमान होण्याची आवई उठवत असले तरी, प्रत्यक्षात मुसलमानांमधील शरियतमध्ये गुन्ह्यांसाठी दिल्या जाणार्या शिक्षा मान्य असणारे आणि इस्लाममध्ये प्रतिबंधित केलेल्या गोष्टी न करणार्या मुसलमानांची गणना केली, तर ते प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे देशापुढील खरे संकट हे अशा छद्म मुसलमानांचेच आहे, असे प्रतिपादन प्रा. कुसुमलता केडिया यांनी अवैध कृत्यांचे प्रमाणपत्र घेतलेले छद्म मुसलमानांचे हिंदु राष्ट्रापुढे आव्हान या विषयावर केले.
अधिवेशनाच्या प्रथमदिनी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे शासनाद्वारे होत असलेले दमन, ज्ञाती संस्था आणि संप्रदाय यांच्या माध्यमांतून धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण आदी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी हिंदुत्वनिष्ठांचे उद्बोधन केले. अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीच्या प्रथम सत्रात हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता या विषयावर भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाचे पूर्व संचालक प्रा. रामेश्वर मिश्र,ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव अनिल धीर, कोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. शिवनारायण सेन, पुणे येथील यूथ फॉर पनून काश्मीरचे राष्ट्रीय संयोजक राहुल कौल, वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु विद्या केंद्राच्या पूर्व संचालक प्रा. कुसुमलता केडिया यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनाला देश–विदेशातील 150 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 350 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुमीत सागवेकर यांनी केले.