हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हातकातरो’ स्तंभाच्या जागृती मोहिमेला प्रारंभ

0
992
पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर धर्मसमीक्षणसभेच्या (इन्क्विझीशनच्या) माध्यमातून केलेल्या अत्याचारांची साक्ष देणारा एकमेव जुने गोवे येथील ‘हातकातरो’ स्तंभ नष्ट करण्याचे कारस्थान गोमंतकात चालू आहे. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट दिनी ‘हातकातरो’ स्तंभाचे जतन करण्याविषयी जागृती मोहिमेला प्रारंभ केला आहे. या मोहिमेच्या अंतर्गत १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात विविध ठिकाणी मंत्रीगण आणि शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या मोहिमेविषयी माहिती दिली, तसेच या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेले जागृतीपर पत्रकही त्यांना सुपुर्द केले. या मोहिमेला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
या अनुषंगाने समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री  फ्रान्सीस डिसोझा, मंत्री  जयेश साळगावकर, बार्देेश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी  गौरेश शंखवाळकर, मामलेदार  दशरथ गावस, डिचोली येथील उपजिल्हाधिकारी हरिश हडकोणकर, म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष  रोहन कवळेकर, नगरसेवक  तुषार टोपले, पणजी येथील ‘मिनेझीस ब्रागांझा इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष  संजय हरमलकर, इतिहासतज्ञ  प्रजल साखरदांडे आदींची भेट घेतली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष  चंद्रकांत (भाई) पंडित, खजिनदार  उदय मुंज, जयेश थळी, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री सुरेश वेर्लेकर, महेश सावंत, नंदकुमार रायकर आदींची उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीने या मोहिमेला अनुसरून एक चार पानी पत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये ‘हातकातरो’ स्तंभाचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास’, धर्मसमीक्षणसभेच्या (इन्क्विझीशन) माध्यमातून वर्ष १५५४ पासून कशा प्रकारे भयंकर आणि अनन्वीत अत्याचार केले, याची एका बोलक्या चित्रासह माहिती, ‘हातकातरो’ स्तंभ नष्ट करण्याचे रचले गेलेले कारस्थान, अत्याचाराच्या स्मृती जपण्याचे महत्त्व, ‘हातकातरो’ स्तंभाच्या रक्षणार्थ करावयाच्या कृती आदींसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने पुढील मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. ‘हातकातरो’ स्तंभाची नोंद ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून करून त्याचे जतन आणि संरक्षण करणे, गोवा शासनाच्या पर्यटनस्थळांची सूची आणि संकेतस्थळ यांमध्ये ‘हातकातरो’ स्तंभ आणि त्याचा इतिहास यांचा अधिकृतरित्या उल्लेख करणे, सर्व पर्यटकांना ‘हातकातरो’ स्तंभाची माहिती व्हावी, यासाठी सर्व पथप्रदर्शकांना (‘गाईड’ना) सूचना देऊन त्यांना ‘हातकातरो’ स्तंभाची माहिती सांगणे अनिवार्य करणे, ‘हातकातरो’ स्तंभाच्या शेजारी या स्तंभाचा ज्वलंत इतिहास लिहिलेला मोठा फलक प्रदर्शित करणे आणि ‘हातकातरो’ स्तंभाची दुरवस्था रोखून त्याच्या रक्षणासाठी संरक्षक कुंपण घालणे