‘हाल’तर्फे  गोव्यातील हेलिकॉप्टर देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहाल (एमआरओ) प्रस्तावित प्रकल्प पुढे नेण्याचा संकल्प :श्रीपाद नाईक

0
923

 

 

गोवा खबर:संरक्षण मंत्रालयातर्फे (एमओडी) ‘हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड’ने (हाल ) गोव्यातील हेलिकॉप्टर देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहाल (एमआरओ) प्रस्तावित प्रकल्प पुढे नेण्याची योजना आखली आहे. २०१6मध्ये त्यांची घोषणा होऊनही ती योजना पुढे जाण्यास अपयशी ठरली होती.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले,  की प्रस्तावित प्रकल्प “पुनरुज्जीवित ” करू, ज्यासाठी यापूर्वीच जमीन अधिग्रहण  करण्यात आली आहे. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ऑक्टोबर  2016 मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील होंडा गावात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), बेंगळुरू आणि फ्रेंच कंपनी “सफ्रान हेलिकॉप्टर इंजिन “यांनी  – ‘हेलिकॉप्टर इंजिन एमआरओ प्रायव्हेट लिमिटेड ‘यांनी संयुक्तरित्या  हेलिकॉप्टर दुरुस्ती  प्रकल्प गोव्यात  उभारण्यासाठी विचार केला होता.

 

“ हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता, परंतु अद्याप तो सुरू झाला नाही. मी ते पुन्हा चालू करीन. फ्रान्स आधारित कंपनीशी झालेल्या कराराबाबत काही अडचण असेल तर आधीची वचनबद्धता संपुष्टात आणून  आम्ही अन्य कोणत्याही समान कंपनीशी करार करू शकतो”, असे नाईक म्हणाले. “ या सुविधेसाठी लागणारी जमीन आधीच खरेदी केली गेली आहे आणि हा उद्योग  त्वरित सुरू होणे आवश्यक आहे. मला करार पुन्हा पडताळून पुढे जावे लागेल,” ते पुढे म्हणाले. योजनेनुसार या सुविधेसाठी एकूण रुपये 170 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामध्ये दोन्ही पक्षांकडून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली जाईल. हा  एचएएलने (हाल )डिझाइन केलेले आणि उत्पादित केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बसविलेल्या इंजिनची देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्तीबद्दलचा प्रकल्प आहे.

ते म्हणाले, “एचएएल आणि ‘सफरण’ यांच्यात सामान्यत: विविध आवृत्त्या, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर आणि भविष्यातील हलकी  युटिलिटी हेलिकॉप्टर्सची प्रगत हेलिकॉप्टरची दुरुस्ती आदी  सुविधा येथे ठेवली जातील.”  १,००० हून अधिक इंजिनच्या ताफ्यासह,२50 टीएम- 3333 आणि २50 ‘शक्तीं’सह सफ्रान-डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टर इंजिनचे   भारताची सशस्त्र सेना सर्वात मोठी वापरदार आहे.

‘शक्ती ‘हे ‘सफ़लॉन आर्डीडेन 1एच1 ‘चे भारतीय  परवाना अंतर्गत उत्पादन आहे.