हाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटूंबियांना न्याय मागण्यासाठी काॅंग्रेसची आजाद मैदानावर धरणे 

0
210
गोवा खबर :संपुर्ण देश आज हाथरस बलात्कार व खुन प्रकरणात बळी गेलेल्या १९ वर्षीय मुलीच्या प्रती हळहळ व्यक्त करीत आहे. त्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळवुन देण्याची मागणी देशातील प्रत्येक नागरीत करीत आहे. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बलात्कारी व खुन्यांना संरक्षण देत आहे. भाजप सरकारच्या ह्या कृत्याचा आम्ही निषेध करतो. सदर मुलीच्या कुटूंबियांना त्वरित न्याय मिळायलाच हवा,अशी मागणी काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पणजी येथील आजाद मैदानावर काॅंग्रेस पक्षातर्फे भाजप सरकारच्या महिलांवरील अत्याचार व हाथरस बलात्कार पिढीतेला न्याय मागण्यासाठी आयोजित धरणे आंदोलनात केली.
बलात्कारी माफीया, ड्रग्स माफीया, खुनी माफीया, दरोडेखोर माफीया, भिकारी माफीया, भ्रष्टाचारी माफीया यांना भाजप सरकारचे संरक्षण आहे. भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार राजवीर पहलवान हे उघडपणे बलात्काऱ्यांना पाठींबा देतात यावरुन भाजपचे गुन्हेगारांना राजाश्रय देण्याचे धोरण स्पष्ट होते असा आरोप  चोडणकर यांनी केला.
आज भाजप बेटी बचाव बेटी पढावची घोषणा देत आहे. पिडीत मुलीच्या कुटूंबियांची परवानगी न घेता व तिच्या आई-वडिलांना अंत्यदर्शन घेण्यासही न देता तिचा मृत्तदेह पहाटे ज्या प्रकारे पोलिसांनी जाळला ते पाहिल्यानंतर भाजपच्या घोषणेला आता जनता नविन तीसरा शब्द जोडतील असे सुचक वक्तव्य विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.
 उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणातील घटनाक्रम ऐकुन मला धक्काच बसला असे सांगुन, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी सदर पिडीत मुलीच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी व राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सदर कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले याचा उल्लेख करुन, सदर मुलीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तीच्या आई-वडिल व कुटूंबियांना न देणे व परस्पर मध्यरात्री तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार करणे हा असंवेदनशीलपणाचा कळस आहे असे  कामत म्हणाले.
माजी मंत्री संगीता परब यांनी आज भाजप सरकार बेटी बचावचा नारा देत आहे परंतु भाजपशासीत उत्तर प्रदेशात आज एका पाठोपाठ एक बलात्कार होत आहेत असे सांगुन त्यानी योगी सरकारचा निषेध केला व भाजपच्या राज्यात महिला असुरक्षित आहेत असे सांगीतले.
सामाजीक कार्यकर्त्या व आर्किटेक्ट राॅयला फर्नांडिस यांनी यावेळी बोलताना काॅंग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनुन सरकारकडे जनतेच्या समस्या मांडण्याचे चालुच ठेवणार असल्याचे सांगीतले.
महिला काॅंग्रेसच्या समाजमाध्यम प्रमुख रोशनी डिसील्वा यांनी हाथरस बलात्कार घटनेचा निषेध केला.
आजच्या मूक सत्याग्रहाचे निमंत्रक विठू मोरजकर यांनी मोदी सरकार दलितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला व उत्तर प्रदेशातील दलीत मुलीवर झालेल्या बलात्काऱ्यांना भाजप सरकार संरक्षण देत असल्याचे सांगीतले.
माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा व संगिता परब, माजी आमदार व्हिक्टर गोंसाल्विस, काॅंग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, बाबी बागकर, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, अमरनाथ पणजीकर, सचिव दामोदर शिरोडकर,
उत्तर गोवा गोवा जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष विजय भिके, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोसेफ डायस , युवक काॅंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, तसेच इतर काॅंग्रेस कार्यकर्त्यानी या धरणे आंदोलनात भाग घेतला.