दाबोळी विमानतळावर हवाई वाहतूक सेवेच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला

0
1873

गोवा खबर:‘आयएनएस हंसा’ या नौदलाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि रनवे नियंत्रक यांच्या प्रसंगावधानामुळे आज गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला.

स्पाईसजेट विमानकंपनीच्या SG 3568 या विमानाचे लँडींगवेळी नोज लँडींग गिअर तैनात करण्यात आला नव्हता. रनवे कंट्रोलर रमेश तिग्गा आणि एटीसी हवाई वाहतूक नियंत्रक लेफ्टनंट कमांडर हरमीत कौर यांनी ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करत तिसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षीतरित्या लँड झाले.