गोवा खबर:महाराष्ट्रातील सांगली येथील 3 युवकांनी एकत्र येऊन उत्तर गोव्यातील हणजुणे या पर्यटकांनी गजबजलेल्या भागात 23 पीपल फॅमेली रेस्टॉरंट आणि अनिकेत बार सुरु केला आहे.ईस्टर संडेच्या पूर्व संध्येला प्रसिद्ध हॉटेल उद्योजक सलीम सय्यद यांच्या हस्ते त्याचे थाटात उद्धाटन करण्यात आले.यावेळी कार्तिक जैना, संदीप पवार,योगेश गायकवाड,अमृत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
23 पीपल फॅमेली रेस्टॉरंट आणि अनिकेत बारच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची मुहूर्त मेढ़ रोवणाऱ्या प्रशांत पाटील, सतीश पुजारी आणि स्मितेश दळवी यांच्यावर उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या रेस्टॉरंट मध्ये गोमंतकिय आणि पर्यटकांच्या सेवेसाठी अनुभवी कूक सेवेत हजर असून गोवन,चायनिज,पंजाबी डिशेस चाखण्यासाठी या रेस्टॉरंटला एकदा भेट द्यायलाच हवी.पार्किंग आणि डायनिंग साठी असलेली हवेशीर जागा हे या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य असून हणजुणे किनाऱ्यावर समुद्र स्नानाचा आनंद लूटल्या नंतर पोटपूजा करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.जेवणासोबत मित्र मंडळी आणि कुटुंबियांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी मोफत वायफाय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.