स्व. मनोहर पर्रीकर यांच्या छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन

0
1406

 गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता दोनापावल येथील एस झेड कासिम ऑडिटोरियमध्ये आयोजित केलेल्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गोव्याचे माजी मुख्यमंत्री  आणि माजी संरक्षणमंत्री स्व. श्री मनोहर पर्रीकर यांच्यावरील दुर्मिळ आणि वेगवेगळ्या  प्रसंगावरील छायाचित्रांच्या द लिजेंड या पुस्तकाचे प्रकाशन करतील.

 

      विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालयाने समाजासाठी विज्ञान या संकल्पनेवर आधारित मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे. पर्रीकरांच्या वचनबध्दतेच्या सन्मानार्थ आणि त्याची दूरदृष्टी पुढे नेण्यासाठी १२ आणि १३ डिसेंबर रोजी दोना पावला येथे आयोजित विज्ञान महोत्सवात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ पहिल्या मलिकेत व्याख्यान देतील.

 

      माहिती आणि प्रसिध्दी खात्याने प्रकाशित केलेल्या द लिजेंड या पुस्तकात माजी मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्यां पैलूंवर तसेच त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक प्रवासावर संकलित केलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे.