स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रीय ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी

0
1135

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती शाडू मातीच्या आहेत असे भासवून विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची, तसेच स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रीय ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने २ ऑगस्ट या दिवशी फोंडा येथील उपजिल्हाधिकारी  नवनाथ नाईक यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये शिवप्रेमी  धीरज कदम, मराठी राजभाषा समितीचे मधुसूदन देसाई, ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. श्रावणी बेहरे, सनातन संस्थेच्या सौ. रेखा कोलवेकर, धर्मप्रेमी सौ. रंक्षदा गावकर आणि सौ. कल्याणी गांगण यांची उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी नवनाथ नाईक यांनी त्वरित संबंधित अधिकार्‍यांना प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले, तसेच सर्व शाळांना प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी कळवणार असल्याचे समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.