स्वातंत्र्यता बाइक रॅलीच्या दुसऱ्या आवृत्तीला मिळाले भरघोस

0
1007

बाइकप्रेमींसाठी गोवा जणू स्वर्गच मानला जातो. प्रत्येक वर्षी शेकडो, हजारो बाइकर्स या राज्याचं सौंदर्य पाहाण्यासाठी आवर्जून येतात. गेल्या वर्षी स्वतंत्रता रॅलीचं यशस्वी आयोजन केल्यानंतर यंदा १५ ऑगस्ट रोजी वाइल्ड ट्रेक आउटडोअर्सने गोवा टुरिझमच्या सहकार्याने गोव्यात स्वतंत्रता बाइक रॅलीच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन केलं होतं. या वर्षीही रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला व त्यात सहभागी झालेल्या ८५ बाइकर्सनी गोव्याच्या अनवट वाटा धुंडाळल्या. स्वतंत्रता रॅली गोव्याच्या विविध स्थानिक भागांतील निसर्गरम्य चर्चेस, धबधबे, समुद्रकिनारे, मंदिरे, गावं आणि असं बरंच काही पाहात पुढे गेली. रॅलीदरम्यान हुतात्मा स्मारक, पत्रादेवी आणि मेयेम तलाव या ठिकाणांनाही भेट देण्यात आली.

रॅलीला जीटीडीसीच्या आर्थिक विभागाचे व्यवस्थापक श्री. डी. बी. सावंत यांनी झेंडा दाखवला. यावेळेस श्री. गॅविन डायस, व्यवस्थापक, मार्केटिंग आणि हॉटेल्स, श्री. लक्ष्मीकांत वायगंणकर, व्यवस्थापक, प्रशासन आणि श्री. दीपक नार्वेकर, वरिष्ठ व्यवस्थापक आणि पीआरओ, जीटीडीसी उपस्थित होते.
रॅली पाहाण्यासाठी ठिकठिकाणी जमलेल्या मोठ्या समुदायाने बाइक्सचे जोशपूर्ण स्वागत केले.
श्री. सावंत यांनी या कार्यक्रमाला मिळालेल्या उदंड यशाबद्दल आनंद व्यक्त केला. श्री. गॅविन डायस म्हणाले, ‘यंदा ही या रॅलीची दुसरी आवृत्ती असून जीटीडीसीही त्याच्याशी संलग्न आहे. या रॅलीमुळे साहस प्रेमी बाइकर्सना गोव्याचे विविध पैलू अनुभवायला मिळतात व स्थानिकांना एका वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद देता येतो. बाइकर्स मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे यावर्षीच्या आवृत्तीला चांगले यश मिळाले.’

याप्रसंगी श्री. दीपक नार्वेकर यांनीही आपले मनोगत मांडले.

साहसपूर्ण अशा या राइडमुळे संपूर्ण अनुभव अविस्मरणीय ठरला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे ही रॅली आणखी मजेदार ठरली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्यांना खास बक्षिसेही देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी होमिओब्लिस आणि रेडकर हॉस्पिटल यांनी वैद्यकीय सहाय्य दिले.