स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज

0
190

 

गोवा खबर:नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यातर्फे, सासष्टी तालुक्यातील दिकरपाल दवर्ली येथे स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज मागविले आहेत.

बेरोजगारांच्या सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती/जमाती, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग व इतर व्यक्ती स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज करू शकतात. स्वस्त धान्याचे दुकान चालविण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा अनुभव असावा व ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत. सुशिक्षित बेरोजगार गोव्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे नांव रोजगार विनिमय केंद्रात नोंद झालेले असावे. उमेदवार १८ ते ४५ वयोगटातील असावा.

पूर्ण भरलेले अर्ज मडगांव येथील जिल्हाधिकारी इमारतीतील तिस-या मजल्यावर कार्यरत असलेल्या नागरी पूरवठा आणि ग्राहक व्यवहार कार्यालयात ६ नोव्हेंबरपूर्वी सादर करावे.