स्वस्त आणि दर्जेदार औषधांच्या सोयीमुळे रुग्णांच्या 11,462 कोटी रुपयांची बचत 

0
1094

गोवा खबर:केंद्र सरकारने सुरु केलेल्या माफक दरातील दर्जेदार औषध उपलब्धतेच्या योजनेमुळे देशभरातील रुग्णांच्या 11,462 कोटी रुपयांची बचत झाली आहे अशी माहिती रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. राष्ट्रीय औषध दर प्राधिकरण एनपीटीएने काही दिवसांपूर्वी 856 औषधांच्या किंमती नियंत्रित केल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना माफक दरात औषधं उपलब्ध होत आहेत.

औषधांसोबतच कोरोनरी स्टेन्टस्‌च्या किंमतीही नियंत्रित केल्या होत्या. यानंतर देशात या स्टेन्टस्‌चा तुटवडा निर्माण झाला नाही असेही मांडवीय यांनी सांगितले. औषधांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एनटीपीए सातत्याने औषध कंपन्यांवर लक्ष ठेऊन आहे असेही त्यांनी सांगितले.

त्याशिवाय औषध निर्माण विभागाने प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे जनतेला स्वस्त दरात जनेरिक औषधे उपलब्ध होतात.