स्वराज,जेटली यांच्या तोडीचा पद्मविभूषण पर्रिकरांना न मिळाल्याची खंत:मोन्सेरात

0
655

गोवा खबर:माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे.पर्रिकर यांना अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या तोडीचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर व्हायला हवा होता.यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांना गोमंतकीयांच्या भावना कळवणार असल्याची माहिती पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

पर्रिकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पणजी भाजप मंडळाच्या वतीने भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना मोन्सेरात यांनी आपली खंत बोलून दाखवली.यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यात आमदार मोन्सेरात यांनी व्यक्त केलेल्या खंतीमुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.