स्वंयपूर्ण गोवा मिशनमध्ये युवांनी सक्रिय भाग घ्यावे : मुख्यमंत्री

0
197

गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नेहरू युवा केंद्रांच्या उत्तर व दक्षिण जिल्हा गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्य युवा संसद कार्यक्रमाचे उदघाटन आज कला व संस्कृती संचालनालात, पाटो पणजी येथे केले.

नेहरू युवा केंद्राने गोव्यामधील चार सहभागी स्पर्धकांची निवड केली असून सदर स्पर्धेकांनी त्यांचे सादरणीकरण केले. दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय युवा सांसद महोत्सव २०२१ मध्ये निवडलेले स्पर्धक त्यांचे सांसदविषयीचे सादरणीकरण करतील.

मुख्यमंत्र्यानी सदर कार्यक्रमाचे उदघाटन केल्यानंतर ते युवांना उद्देशून म्हणाले, राज्यातील युवा धोरणांविषयींची माहिती सांगितली आणि १२ जानेवारीपासून  सुरू होणार्‍या युवा सप्ताह  उत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री स्वामी विवेकानंदाचे संदर्भ उद्धृत करीत म्हणाले, आमच्या जीवनातील प्रत्येक गैरसमजूतीला कारणीभूत आमची मानसिकता ठरलेली दिसते. आम्ही आमच्या मानसिकतेद्वारे पुढच्या व्यक्तीकडे पाहत असतो पण पुढील माणसाची मानसिकता ही आपल्यापेक्षा भिन्न असते. यामुळे गैरसमज निर्माण होताना दिसतात कारण प्रत्यक्ष वस्तूस्थिती ही वेगळी असते. युवांनी स्वामी विवेकानंदाचा आदर्श बाळगून त्यांचे विचार व सिध्दांताचे योग्य आकलन करावे. जागृत व्हा आणि लक्ष्य प्राप्त करेपर्यंत थांबू नका या त्यांच्या विचारसरणीचा अंगिकार करून युवांनी समाजाचे नेतृत्व करावे.

युवांनी स्वयंपूर्ण गोवा मिशनात सहभागी होऊन त्यांनी त्यांचे विचार व सक्रिय योगदान देण्याविषयी आवाहन केले.

नेहरू युवा केंद्रचे जिल्हा युवा समन्वयक कालिदास घाटवळ यांनी कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी कला व संस्कृतीचे संचालक सगुण वेळीप, कांता गावडे आणि मान्यवर उपस्थित होते.

स्वयंपूर्ण गोवा याची नागरी क्षेत्रात अंमलबजावणी करावी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध खात्यातील अधिकार्‍यांशी बैठक घेऊन स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेचा विस्तार नगरपालिका क्षेत्रात व्हावा याविषयीची चर्चा केली.

या बैठकीला नियोजन आणि सांख्यिक खात्याचे संचालक वाय. दुर्गाप्रसाद, नगरपालिका प्रशासनाचे संचालक डॉ. तरीक थॉमस, आयएएस, औद्योगिक खात्याचे संचालक दीपक बांदेकर, तांत्रिक संचालनालयाचे संचालक विवेक कामत, मुख्यमंत्र्याचे संयुक्त सचिव वी. पी. डांगी उपस्थित होते.

नागरी क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करून स्वयंपूर्ण गोवा यांची लवकरच अंमलबजावणी करणे हे सरकारचे ध्येय आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय आणी जीआयपीएआरडी सर्व्हेक्षण करतील. कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ राज्यासाठी आवश्यक आहे आणि खासगी क्षेत्रात हे मनुष्यबळ कसे स्थापित करावे हे या सर्व्हेक्षणाचे प्रमुख लक्ष्य असेल. गोवा सरकारने तांत्रिक शिक्षण, औद्यौगिक आणि मजूर खात्याकडे या संदर्भातील अहवाल मागवले आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करणे हे प्रमुख उदिष्ठ आहे. याद्वारे स्थानिक युवांना रोजगाराची चांगली संधी निर्माण होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.