स्मार्ट सिटी म्हणजे गोव्याला कर्जाच्या खाइत लोटणे :काँग्रेस

0
1065

स्मार्ट सिटी साठी केंद्र सरकार पूर्ण पैसे देत असतील तर त्याचे आम्ही स्वागतच करू.मात्र केंद्र सरकार फक्त 50टक्के पैसे  देणार असून उरलेले पैसे राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थेला उभारावे लागणार असून ही बाब वाटते तेवढी सोपी नाही.उद्या पणजी स्मार्ट करण्यासाठी कर्ज काढून पैसे उभारावे लागले तर गोवा कर्जाच्या खाइत जाणार असल्याचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी आज केला. पणजी स्मार्ट करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.सरकार स्मार्ट सिटीसाठी ज्या साधन सुविधा उभरणार त्यासाठी सध्याच्या इमारती पाडणार का,असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. सरकार हा प्रकल्प सांभाळण्यासाठी लागणारा निधी कसा उभारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.त्यामुळे भविष्यात स्मार्ट सिटीच्या सुविधा उपभोगण्यासाठी टोल भरावा लागेल.ही बाब पणजीच्या नागरीकांनी लक्षात घ्यावी असे नाईक म्हणाले.

पणजीतील गुलाब बाग प्रकल्प रखड़ण्याला पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हेच जबाबदार असून त्यांना आपल्या मतदारसंघात काँग्रेस नेत्याने पूर्ण केलेला प्रकल्प नको होता त्यामुळेच ही बाग पूर्ण होउ शकली नाही असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले.