स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण द्या-कुतिन्हो

0
1045
 गोवा खबर :स्थानिक स्वराज्य संस्थांत महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात देखील 50 टक्के आरक्षण मिळायला हवे अशी  मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसने आज राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे केली. गोव्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांत 33 टक्के आरक्षण आहे.
 प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली आज एक शिष्टमंडळ  राज्यपालांना भेटले.सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर  त्यांनी महिला काँग्रेसने केलेल्या मागण्या रास्त असल्याचे नमूद केले. गोव्याच्या विधानसभेत आणि संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात केली. यापूर्वी महिला काँग्रेसने राष्ट्रपती राजनाथ कोविंद,  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती.
  लाडली लक्ष्मी योजनेची रक्कम मिळविण्यासाठी असलेल्या अनेक अटींत विवाह करणे ही एक अट आहे. ती अट हटवावी, अशी मागणी महिला काँग्रेसने आज राज्यपालांकडे केली. विवाहासाठी ही रक्कम मिळत असल्याने त्या रकमेवरून युवतीच्या सासर व माहेरांत तणावाचे वातावरण होते याचा नाहक त्रास त्या युवतीला भोगावा लागतो. याकडे राज्यपालांचे लक्ष वेधल्याचे अॅड. कुतिन्हो यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष बीना नाईक, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावित्री कवळेकर आदी होत्या.