स्त्री-पुरुष समानतेसाठी दोघांच्या सहकार्याची गरज

0
563
ऊर्जा वेलनेसने सिल्वरलाइन वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन कार्यक्रमात व्यक्त झाला सुर
गोवा खबर::सध्या पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्व क्षेत्रात वावरत आहेत.समाजात स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता आणायची असेल तर दोघांनी एकमेकांना साथ देऊन पुढे जाण्याची गरज आहे,असा सुर मडगाव रवींद्र भवनमध्ये उर्जा वेलनेस सेंटरतर्फे आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त झाला.
महिला दिना निमित्त महिलाशी निगडित अनेक विषयांवर जाणकारांनी मते मांडून उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले.

सरकारने महिलासाठी अनेक कायदे तयार करुन त्याची अंमलबजावणी केलेली आहे. पण त्या कायद्याची माहिती प्रत्येक महिलेला असण्याची गरज आहे. तसेच त्याचा  फायदाही घेण्याचा प्रयत्न करावा. राजकारणात जेव्हा एकाद्या पुरुष उमेदवाराला निवडून आणायचे असेल तर महिलासुद्धा त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावी यासाठी जोमाने काम करतात. त्यामुळे प्रत्येक पुरुषांनी महिलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण महिलांच पुरुषांना सावरु शकतात असे प्रतिपादन समाजसेविका आवदा व्हिएगस यांनी केले.

आज प्रत्येक दिवशी मुलीवर लैंगिक अत्याचार होत असतात. हे प्रकार आत्ता महिलांनी पुढे येऊन बंद केले पाहिजे. कारण मुलाला जन्म देण्याचे काम हे महिलाच करतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला हवेत. 13 ते 15 वर्षाच्या मुली घरातून पळून जातात व मंदिरात जाऊन लग्न करतात. ज्या मुलाचे लग्नाचे वय सुद्धा झाले नाही, त्या मुली अशा प्रकारचे निर्णय का घेतात यावर आम्हाला विचार करण्याची गरज आहे असे व्हिएगस यांनी पुढे बोलताना सागितले.
आज जरी सरकारने महिलासाठी आरक्षण ठेवले आहे तर ते कायमचे राहतील याची हमी कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने पुरुषासारखे स्वतंत्र्यपणे फिरुन स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. तसेच पैशांची बचत कशा प्रकारे करावी याची कला महिलाशिवाय आणखी कुणाकडे असू शकणार नाही असे व्हिएगस पुढे बोलताना म्हणाल्या.
यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. घरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या स्पर्धेत  शुभदा कामत आणि इशरत बेगम यांनी प्रथम क्रमांक पटकावला,कलात्मक महिला उद्योजक स्पर्धेत नीलिशा फेराओ यांनी प्रथम तर अमृता पिंटो यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आवदा व्हिएगस यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी चौगुले इंडस्ट्रीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजश्री पै प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते.त्याशिवाय निता नाईक, यशवंत गावस, डॉ. स्नेहा भागवत,श्रीमी पाणंदीकर व आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.