स्तनपानाला चालना देण्यासाठी सप्ताह

0
1302
स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या निमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय पातळीवर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
स्तनपानाला अधिक चालना देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने “MAA अर्थात मदर्स ॲब्सल्युट अफेक्शन म्हणजेच आईची निखालस ममता” हा राष्ट्रीय कार्यक्रमही सुरु केला आहे. तसेच आजारी आणि दिवस पूर्ण होण्यासाठी जन्मलेल्या मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी दूग्धप्रदान व्यवस्थापन केंद्रासाठीची मार्गदर्शक तत्वंही मंत्रालयाने प्रसारित केली आहेत.
MAA उपक्रमात “आशा” कार्यकर्त्या गर्भवती आणि स्तनदा मातांना स्तनपानाचे फायदे आणि तंत्र समजावून सांगतात. आतापर्यंत 23 राज्यांनी MAA उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.
स्तनपान ही मुलांचे आरोग्य आणि बचाव यासाठी कार्यक्षम आणि फायदेशीर उपाययोजना आहे.
गेल्या दशकात स्तनपानाच्या टक्केवारीत 23.4 टक्क्यांवरुन 41.6 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची आकडेवारीत स्पष्ट झालं आहे.