स्ट्राँगमॅन इंडिया लीग पर्यटकांसाठी आकर्षण:खंवटे

0
2586
गोवा खबर:विन्सन वर्ल्ड तर्फे आयोजीत स्ट्राँगमॅन इंडिया लीग स्पर्धा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरण्यात यशस्वी ठरली.विन्सन वर्ल्ड हा उपक्रम स्तुत्य आहे,असे प्रतिपादन महसुल मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
पणजी येथील मीरामार किनाऱ्यावर आयोजीत स्ट्राँगमॅन इंडिया लीग पाहण्यासाठी देशी पर्यटकांबरोबर स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.30 ते 100 किलो पर्यंतचे वजन उचलणारे पुरुष आणि महिला स्पर्धक प्रथमच गोव्यात येऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत होते.जीप उचलणे असो की 100 किलोची पोती सगळ्याच स्पर्धकांनी दम लगा के प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.देशभरातून 45 स्पर्धक यात सहभागी झाले होते.विकिंग प्रेस, कार डेड लिफ्ट,एटलास स्टोन,फ्रेम कॅरी आणि लोडिंग रेस या प्रकारात पुरुष खेळाडुंनी प्रदर्शन केले. क्रुकीफिक्स,कार डेड लिफ्ट,स्टोन ओव्हर बार आणि लॉंग लिफ्ट प्रकारात महिला खेळाडुंनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत हम भी कुछ कम नहीचा प्रत्यय दिला. खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानीकांबरोबर देशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संजय शेट्ये,श्रीपाद शेट्ये,सिद्धेश म्हांबरे,ज्ञानेश मोघे आदी उपस्थित होते.विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.