‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’कडे भारत आणि जगभरातील पर्यटक आकर्षित

0
1813

 

 

 • स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे
 • 182 मीटर्सची भव्य उंची, मनुष्यनिर्मित मूर्ती अवकाशातून दृश्य
 • उद्घाटनानंतर दोनच आठवड्यांत 1.3 लाख पर्यटक दाखल
 • लोनली प्लॅनेट बेस्ट इन ट्रॅव्हल 2019च्या टॉप 10 ग्लोबल रिजन्स यादीत गुजरात 7व्या क्रमांकावर

 गोवा खबर:गुजरात टुरिझमच्या वतीने शहरातील हॉटेल विवांता बाय ताज येथे एक प्रमोशनल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील नव्या संधींची घोषणा करण्यात आली. यावेळी गुजरात टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड (टीसीजीएल) चे व्यवस्थापक सनातन पांचोली,स्टॅच्यु ऑफ युनिटीचे मुख्य व्यवस्थापक संजय जोशी यावेळी उपस्थित होते. यावेळी रोडशो दरम्यान त्यांनी मीडिया, टूर ऑपरेटर्स आणि हॉटेलियर यांच्यासोबत संवाद साधला.

लोकल ते ग्लोबल पटलावर स्टॅच्यु ऑफ युनिटीमध्ये ज्या प्रचंड क्षमता आहेत, त्या रोडशो’मधून अधोरेखित करण्यात येतात. 182 मीटर एवढे भव्य असे सरदार पटेलांचे स्मारक जगातील मनुष्यनिर्मित प्रकारातील सर्वात उंच पुतळा असून तो अवकाशातूनही दिसतो. गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील केवाडियातील एका बेटावर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. सरदारांचे हे स्मारक अगोदरचा सर्वात उंच पुतळा म्हणजे चीनमधील हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्धाहून 54 मीटर (177 फूट) उंच आहे. याआधीचे सर्वात उंच पुतळे म्हणजे जपानमधील युशिकू दायबत्सु (120 मीटर्स), म्यानमार येथील लेक्यून सेक्य बुद्ध (116 मीटर्स) आणि चीनमधील सान्याच्या दक्षिण सागरातील गुआन यीन (108 मीटर्स) हे आहेत.

2013मध्ये श्री. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी या मूर्तीची पायाभरणी करण्यात आली होती. या पुतळ्याची उभारणी 56 महिन्यांत करण्यात आली व 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभाचे अध्यक्षपद भूषवले. 1 नोव्हेंबर पासून हे ठिकाण सार्वजनिकरित्या खुले झाल्यापासून 1.3 लाखहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.

स्टॅच्यु ऑफ युनिटीचे मुख्य व्यवस्थापक संजय जोशी म्हणाले की, “स्टॅच्यु ऑफ युनिटी’ने केवाडियाला जागतिक नकाशावर आणले, भविष्यात हे सर्वात लोकप्रिय स्थळ बनेल. या मूर्तीने जगभरातील मीडियाचे लक्ष वेधले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बोलबाला व्हायला मदत झाली. स्टॅच्यु ऑफ युनिटी हे वैश्विक प्रतिष्ठेचे स्मारक बनल्यावर अधिकाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक याठिकाणी ओढला जाईल.” ते पुढे म्हणाले की, “आम्ही प्रवाशांसाठी आकर्षक पॅकेजेस घेऊन तयार आहोत. जेणेकरून त्यांना आमच्या टेंट सिटी नर्मदाचा अभिनव अनुभव घेण्याची संधी मिळेल, निसर्गाच्या सानिध्यातील हा एक समृद्ध अनुभव राहील.”

पर्यटकांकरिता मुख्य आकर्षणे आणि सुविधा

स्टॅच्यु ऑफ युनिटी

हे स्मारक अतिशय प्रेरणादायी असून त्याचे काही शिक्षण-मनोरंजन घटक आहेत. हा संपूर्ण परिसर विंध्याचल आणि सातपुडा पर्वतराजींमध्ये पसरलेला असून नर्मदेचा उगम, गरुडेश्वर कालवा परिसर, सरदार सरोवर धरण आणि केवडिया शहराला सामावून घेणारा आहे. या भव्य-दिव्य पुतळ्याला नयनरम्य पार्श्वभूमी लाभल्याने त्याच्या देखणेपणात भरच पडते. आता स्मारकाची ही साईट पूर्णपणे कार्यान्वित झाली असून याठिकाणी म्युझियम व ऑडीयो व्हिज्युअल गॅलरी, व्युविंग गॅलरी, हाय-स्पीड लिफ्ट, लेसर, लाईट आणि साऊंड शो, इतर आदरातिथ्य व मनोरंजनपर घटक यांचा समावेश आहे. शिक्षण-मनोरंजनाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेलांचे द्रष्टे विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

श्रेष्ठ भारत भवन

वास्तूशिल्पाचे आश्चर्य असलेले श्रेष्ठ भारत भवन, त्याच्या बाल्कनीत हिरवाई दिसते, इमारतीला लागून असलेले लँडस्केप पर्यावरण-स्नेही संकल्पनेवर आधारलेले आहे. गोलाकार स्टेअर हॉल बागेच्या दिशेने तोंड असलेला आहे, त्यातच पुढून वाहणारी नदी भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना खास व अविस्मरणीय अनुभव देणारी ठरेल. पर्यटकांसाठी भव्य पार्किंग एरिया आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी लागणाऱ्या तिकिटांची खरेदी इथूनही करता येते.

 

वॉल ऑफ युनिटी

नर्मदा नदीच्या विरुद्ध अंगाच्या किनाऱ्यावर भव्य भिंतीवर (सुमारे 350 फूट x 40 फूट) “स्टॅच्यु ऑफ युनिटी” हे शब्द लिहिलेले दिसतात. प्रचंड मोठी वॉल ऑफ युनिटी (50 फूट x 15 फूट) राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून तीची उभारणी स्टॅच्यु ऑफ युनिटी’नजीक करण्यात आली आहे. भारताच्या विविध राज्यांतील 1,69,078 गावांमधून माती जमा करण्यात आली असून तिचा वापर भारताची विविधतेतील एकता दर्शवण्यासाठी बांधकामात वापरण्यात आली आहे.    

म्युझियम

भला मोठा एक्झिबिशन हॉल 4,647 चौरस मीटरवर पसरला असून स्टॅच्यु ऑफ युनिटीचा पादचारी भाग  आहे. सरदार पटेलांचे जीवन, ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सरदार पटेलांचे योगदान, खालसा संस्थाने या विषयावर आधारलेली माहिती ऑडीयो-व्हिज्युअल शो’च्या माध्यमातून सादर करण्यात येते. या ध्वनिचित्रफितीमार्फत शूलपाणेश्वर वन्यजीव अभयारण्य, गुजरातची आदिवासी लोकसंस्कृती व सरदार सरोवर धरणाचा वेध घेता येतो.  या शोमुळे पर्यटकांना अद्वितीय अनुभव मिळेल.

प्रोजेक्शन मॅपिंग (लाईट अँड साऊंड शो)

लाईट अँड साऊंड शो’च्या माध्यमातून स्टॅच्यु ऑफ युनिटीवर लेसर लाईटचा खेळ संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान रंगतो. या शोमध्ये सरदार पटेलांची जीवनयात्रा, ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे  योगदान, खालसा संस्थाने याविषयी माहिती मिळते.

सरदार सरोवर धरण

गुजरात राज्यातील नर्मदा नदीच्या तीरावर सरदार सरोवर धरण वसलेले आहे. हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कॉन्क्रीट ग्रॅव्हीटी डॅम असून तो 1.2 किमी लांब आणि खोल पायापासून 163 मीटर उंच आहे. या धरणाची पाणी वहनक्षमता सर्वाधिक म्हणजे 40,000 क्युसेस इतकी आहे, हा अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा एक अनोखा आविष्कार असल्याने पर्यटक आणि अभियंत्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.

फूड कोर्ट

पर्यटकांसाठी अगदी किफायतशीर दरात अनेक चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ याठिकाणी उपलब्ध आहेत. फूड कोर्टवरूनही सरदार सरोवराचे मनोहारी दृश्य टिपता येते.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

“व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” नर्मदा नदीवरील गोरा आणि केवाडिया किनाऱ्यावर आहे. नर्मदा नदीवरील 17 किलोमीटर परिसरात 230 हेक्टर्स परिघात फुलवली आहे. याठिकाणी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फुलांचे ताटवे असून दरवर्षी फुलांच्या हंगामात पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहील.

रिवर बेड पॉवर हाऊस

पर्यटकांना 1200 मेगा वॅट आणि 200 एमडब्ल्यू 6 फ्रान्सिस रिव्हर्सेबल टर्बाइन्स क्षमतेच्या रिव्हर बेड पॉवर हाऊसचा अनुभव घेता येईल.

गोडबोले गेट

नर्मदा नदीतून कायमच होणारा पाण्याचा विसर्ग, सरदार सरोवर धरणाचे पाणी गोडबोले गेटमधून सोडले जाते. पर्यटक प्रवाहाचा अनुभव आता या गोडबोले गेटमधून घेऊ शकतात.

मेन कॅनल हेड रेग्युलेटर

तब्बल 458 किलोमीटर लांबीचा नर्मदा मेन कॅनल हा जगातील सर्वाधिक लांबीचा काँक्रीट लाईन सिंचन कॅनल असून त्याची क्षमता 40,000 क्युबिक फूट प्रति सेकंद इतकी आहे. या कॅनलमधून प्रत्येक वर्षाला 11.7 अब्ज क्युबिक मीटर इतके पाणी वाहून नेले जाते.

बोटिंग

धरणाच्या वरील बाजूस असणार्‍या खास बनवलेल्या जागेत पर्यटक बोटींगचा आनंद लुटू शकतात. बोटींग करत असतानाच ते सातपुडा आणि विंध्यचल डोंगररांगांचे पॅनारोमिक दृष्यही पाहू शकतात.

टेंट सिटी नर्मदा

स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या सावलीत टेंट सिटी नर्मदा अतिशय सुंदर पध्दतीने वसवण्यात आली आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनापासून दूर जाऊन निसर्ग सौंदर्याच्या सहवासात राहू इच्छिणार्‍या शहरी पर्यटकांसाठी हे एक परिपूर्ण आलिशान निसर्ग रिसॉर्ट आहे. या ठिकाणी चढ उतार असणार्‍या टेकड्या, तलाव, झाडी तसेच सर्वात महत्वाची म्हणजे प्रदुषणविरहीत हवा सर्वांना आकर्षित करेल.

टेंट सिटी नर्मदामधील टेंट नेस्टलिंग्ज ही सुनियोजित, आलिशान आणि पंचतारांकीत सुविधा तसेच पंचतारांकीत खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणारी ठिकाणे आहेत. येथे शहरापासून दूर अशी क्वीक 1-डे तसेच लेझी 2-डे अशी पॅकेजेस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विकेंड, सुट्ट्या, खास प्रसंग, शैक्षणिक सहली, कॉर्पोरेट आउटिंग्ज या सगळ्यांसाठी टेंट सिटी नर्मदा ही परिपूर्ण निसर्ग मेजवानी आहे.

रिसॉर्टमध्ये सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या गरजेनुसार तीन प्रकारचे वास्तव्य पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये लक्झरी टेंट्स, डिलक्स टेंट्स आणि स्टँडर्ड टेंट्स यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अद्ययावत आणि परिपूर्ण सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या जातात.

 

 

प्रमुख आकर्षणे

 • जगात सर्वाधिक उंच असणारा 182 मीटर उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटी
 • 135 मीटर उंचीवरील पुतळ्याच्या छातीच्या पातळीपर्यंतची व्ह़्युईंग गॅलरी. ज्यामध्ये एका वेळी 200 पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता
 • दोन हेवी लोड ग्लास इलेव्हटर्समुळे वरच्या दिशेने जात असताना अतिशय चित्तथरारक असा पॅनारोमिक व्ह्यू अनुभवता येतो.
 • पुतळ्याच्या तळाला मेमोरियल गार्डन
 • प्रिमियम एसी आणि नॉन एसी तंबुंमध्ये राहण्याची व्यवस्था
 • ऐतिहासीक शूळपानेश्वर मंदीर आणि मॅजेस्टिक राजवंत पॅलेसची साईटसिईंग टूर
 • खरेदी आणि संस्कृतीचा मनमुराद आनंद
 • स्टॅच्यु ऑफ युनिटीसह सुंदर फोटोज घेण्यासाठी सेल्फी पॉईंट
 • लज्जतदार प्रादेशिक, भारतीय तसेच काँटिनेंटल खाद्यपदार्थांची मेजवानी
 • इकोटुरिजम साईटचा अनुभव घेण्यासाठी हायकिंग टूर

तिकीट दर

प्रवेश तिकीट प्रौढांसाठी 120 रुपये तर लहान मुलांसाठी 60 रुपये इतके असेल. व्ह्युईंग गॅलरी पॉईंटसवर जाण्यासाठी प्रौढांना 350 रुपये तर मुलांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. साईटस्थळी अंतर्गत बसमधून फिरण्यासाठी प्रतिव्यक्ती 30 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. एंट्री पॉईंट्स आणि व्ह्युईंग गॅलरीच्या ठिकाणी रांगेत प्रतिक्षा करणे टाळण्यासाठी 1,000  रुपयांचे एक्सप्रेस तिकीटही उपलब्ध आहे.

स्टॅच्यु ऑफ युनिटीचे दर्शन सकाळी 9 वाजता सुरु होऊन सायंकाळी 5 वाजता बंद होते. पर्यटक या ठिकाणी मंगळवार ते रविवारपर्यंत येऊ शकतात. प्रत्येक दिवशी केवळ 5,000 पर्यटकांनाच प्रवेश दिला जात असल्यामुळे तिकीट बुकींग ऑनलाईन पध्दतीने करणे योग्य ठरते. गर्दी टाळणे, पर्यटकांची सुरक्षा आणि सहजसुलभ इकोसिस्टीम ऑपरेटिंगसाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत हळूहळू प्रवेश दिल्या जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढवण्यात येईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सोमवारी मेंटेनन्सच्या कामामुळे स्टॅच्यु ऑफ युनिटी पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवला जाणार आहे.

सन 2019 च्या सर्वोत्कृष्ट पर्यटनाच्या जागतिक यादीत गुजरात सातव्या क्रमांकावर

लोनली प्लॅनेटने प्रसिध्द केलेल्या 2019 च्या सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांच्या जागतिक यादीत गुजरातला सातव्या क्रमांकावर ठेवले आहे. या यादीमध्ये इटलीतील पिडमाँट पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेतील कॅटस्किल्स आणि उत्तर पेरु यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान दिले आहे. लोनली प्लॅनेटने या ठिकाणांना 2019 मध्ये भेट द्यावीच अशा टॉप 10 मध्ये स्थान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातला भारतामध्ये भरपूर लोकप्रियता मिळाली असून जागतिकदृष्ट्याही पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे.

 

 

गुजरात राज्यातील पर्यटनाचा आढावा

गुजरातमध्ये एक प्रमुख पर्यटनस्थळ बनण्याची अमर्याद क्षमता आहे. यावर्षी गुजरातला 326.91 लाख पर्यटकांनी भेट दिली. 2013-14चा विचार करता हे प्रमाण 13.56 टक्के अधिक आहे. अलिकडेच युनेस्कोने राणी-की-वाव ला जागतिक वारसा स्थळाला दर्जा बहाल केला आहे. सरकारकडून इव्हेंट आधारीत पर्यटनावर भर दिला जात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पर्यटकांना गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सव, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव, रण उत्सव आणि तार्नेतर फेअरचे आयोजन करण्यात येत आहे.

आज गुजरात पर्यटकांसाठी अतिशय चित्तथरारक पर्यटनस्थळांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करुन देत आहे. यामध्ये आकर्षक लोकेशन्स आणि निसर्गदृष्यांचा समावेश आहे. जीवंत संस्कृती आणि समृध्द परंपरा या माध्यमातूनही गुजरात जगभरातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. अद्वितीय पुरातत्व वास्तू, अनेक प्रकारची बांधकाम आश्चर्ये यासोबत दिमाखदार इतिहास आणि अनेक धर्मांमधील भाविक यात्रेकरुंसाठी धार्मिक स्थळेही गुजरातचे खास वैशिष्ट्य बनले आहे. भगवान श्री कृष्ण आणि अहिंसेचे प्रतीक समजले जाणारे महात्मा गांधी यांच्यासह अनेक पौराणिक आणि ऐतिहासीक व्यक्तींची कर्मभुमी म्हणूनही गुजरातची ओळख आहे.