सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना 

0
918

गोवा खबर:देशात सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार, दक्षिण कोरियामधून ड्युटी फ्री सोन्याच्या आयातीवर निर्बंध तसेच 22 कॅरेटपेक्षा जास्त शुद्ध सोन्याच्या आभूषणांवर तसेच पदके आणि नाण्यांच्या निर्यातीवरही निर्बंध घालण्यात आले.

 या उपाययोजनांमुळे चालू वर्षात एप्रिल-मे 2018 या अवधीत सोन्याच्या आयातीत मागील वर्षाच्या याच अवधीच्या तुलनेत31.25 टक्के घट झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.