सोनसोडो प्रकल्पावर उपाय काढून कचरा प्रश्न सोडवणार:मुख्यमंत्री

0
915
गोवा खबर: कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पावर उपाय काढला पाहिजे या मतावर ठाम आहे. फामेंतो आणि मडगाव नगरपालिकेमधील प्रकरण सरकारतर्फे सोडवण्यात येणार आहे. लोकहितासाठी सोनसोडो प्रकल्प गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे देण्यासाठी मी वैयक्तिकरीत्या फोमेंतोच्या अध्यक्षा सोबत बोलून विनंती  करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली.

मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरीतील सचिवालयातील परिषदगृहात आयोजित करण्यात आलेल्या सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उच्च स्तरीय समितीची आणि बायंगिणी येथील नियोजित घनकचरा व्यवस्थापन सुविधा संबंधित बैठक पार पडली .
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, नगर विकासमंत्री  मिलिंद नाईक, विरोधी पक्षनेते  दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आलेक्स लॉरेन्स, मडगावच्या नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभूदेसाई, मुख्य सचिव  परिमल राय, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आजित रॉय, नगरपालिका प्रशासनाचे संचालक डॉ. तारीक थॉमस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता गोपाळ पार्सेकर, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवा  शर्मिला मोंतेरो, गोवा औध्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  एस. व्ही. नाईक, वित्त सचिव  सुनील मसुरकर, मडगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सिध्दीविनायक नाईक, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे संचालक  लेविन्सन मार्टीन्स, गोवा राज्य नगरविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  श्रीनेत कोठावळे, मडगाव नगरपालिकेचे वकिल ॲड पडियार आणि इतर अधिकारी सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत उपस्थित होते.
ॲड पडियार यांनी कायदेशीर पैलूंची आणि सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या इतिहासाची सविस्तर माहिती दिली.
 लेविन्सन मार्टीन्स यांनी सदर प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीची माहिती दिली तसेच सोनसोडो प्रकल्पाच्या कार्याची माहिती दिली.
बैठकीत बायगिणी धनकचरा व्यवस्थापन सुविधा, निधी पुरविणे आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.