‘सेव्हन लास्ट वर्डस्’ च्या निर्मितीमध्ये संगीताचे मोठे योगदान-केवेह नाबातियन

0
462

इफ्फी चित्रपटांतील संगीत आणि चित्रपट यांच्यातील संवाद

‘क्लिओ’ वैश्विक चित्रपट-इव्हा कुल

 

 

संगीत विश्वाला आत्मा देते, मनाला पंख देते, कल्पना शक्तीला भरारी देते आणि सर्व गोष्टींना जीवन देते. 50व्या इफ्फी महोत्सवातील माध्यम कक्षात आज चित्रपटांमध्ये संगीताच्या शक्तीचा वापर करणारे दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते. ‘द सेवन लास्ट वर्डस्’मधील कलाकार आणि ‘क्लिओ’ या बेस्नियन चित्रपटाचे दिग्दर्शक पत्रकार परिषदेत सहभागी झाले.

 

‘सेव्हन लास्ट वर्डस्’ चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना या चित्रपटाच्या सात दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक कावेह नाताबियन यांनी सांगितले की ‘सेव्हन लास्ट वर्डस्’ हा चित्रपट फ्रान्झ जोसेफ हेडनच्या विख्यात सुरवटीवर आधारीत आहे. धार्मिक लिखाण हा जरी या चित्रपटाचा पाया असला, तरी नश्वरतेला तोंड देणाऱ्या मानवाची कल्पना हा एक वैश्विक विषय आहे. सुरुवातीला मी स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित करणार होतो. पण त्यात केवळ एकाच व्यक्तीचा दृष्टीकोन दिसला असता आणि या चित्रपटासाठी एकापेक्षा अधिक दृष्टीकोन असणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या चित्रपटात संगीताने सर्व बांधण्याची किमया केली असून मृत्यू, पुनर्जन्म, स्वातंत्र्य या सारख्या कल्पनांना साधणारा हा चित्रपट अंतर्मुख करणारा आणि अतिशय संवेदनशील आहे. हेडनच्या संगीत रचना जरी 15व्या शतकाच्या उत्तरार्धातल्या असल्या तरी त्यातील संगीत आजच्या काळाचेही प्रतिनिधीत्व करते, असे ते म्हणाले.

‘सेव्हन लास्ट वर्डस्’ चे सह दिग्दर्शक जुआन एँड्रेम अरांगो यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करणे हा आनंददायी आणि आल्हादक अनुभव असल्याचे सांगितले. आरियाना लोरीन या सह दिग्दर्शिकेने या चित्रपटात संगीताने धागे जुळले असल्याचे सांगितले. या चित्रपटातील कलाकार जेरेमी पॉलिऑट यांनी नि:शब्दपणे भावना व्यक्त करणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगितले.

‘क्लिओ’च्या दिग्दर्शिका इव्हा कुल यांनी हा चित्रपट मोटार अपघातात आई-वडील गमावलेल्या एका मुलाचे संगीताच्या माध्यमातून दु:खाशी जुळवून घेण्याची गोष्ट आहे, असे सांगितले. हा चित्रपट मानवी आशेबद्दलही आहे. प्रत्येक जण भरोसा ठेवू शकेल, असा हा वैश्विक चित्रपट आहे. मी देखील कोणाला तरी मोटार अपघातात गमावले होते त्यामुळे हा वैयक्तिक चित्रपट आहे, असे त्या म्हणाल्या. या चित्रपटातील संगीताच्या भूमिकेवर भर देताना त्या म्हणाल्या की रशियन शास्त्रीय संगीताचे संगीतकार रॅचमिनोफ यांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगितले.