सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2019 पुन्हा एकदा पणजी येथे

0
1119

गोवा खबर: सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल या आपल्या मुख्य कला उपक्रमासह सेरेन्डिपिटी आर्ट्स फाउंडेशन दि. 15 – 22 डिसेंबर 2019 दरम्यान पणजी, गोवा येथे परतत आहे. हा वार्षिक, विविध विभागांतील उत्सव सर्वांसाठी खुला आहे आणि यंदा 90 पेक्षा जास्त डायनॅमिक प्रोजेक्ट येथे सादर होतील, ज्यात 1200 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग असेल व त्यातून भारताच्या संगीत, नृत्य आणि रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडेल व त्याचबरोबर फोटोग्राफी, पाक कला, हस्तकला आणि दृश्य कला प्रदर्शनंदेखील असतील.

2014 मध्ये सुनील कांत मुंजाल यांनी स्थापन केलेले सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशन ही एक ना-नफा संस्था आहे, जिचा उद्देश आहे, दक्षिण आशियात कला उत्पादनाला अधिक ऊर्जावान करणे, त्याबद्दलची जागरूकता आणि त्याचे चलन वाढवणे. या फाऊंडेशनचा सुरुवातीचा उपक्रम असलेल्या सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलची ही चौथी आवृत्ती आहे, ज्यात दक्षिण आशियाई क्षेत्रातील 7 शाखांमधील प्रोग्रामिंगची आकर्षक रेंज दाखवून पणजीचा कायापालट होईल.

2019 साठीचे क्युरेटर्स आहेत: हस्तकला: प्रमोद केजी, ख्रिस्टीन माइकल | संगीत: अनीष प्रधान आणि स्नेहा खानवलकर | रंगभूमी: अतुल कुमार आणि अरुंधती नाग | नृत्य: लीला सॅमसन आणि मयुरी उपाध्याय | पाककला: राहुल अकेरकर आणि प्रल्हाद सुखटणकर | दृश्य कला: डॉ. ज्योतींद्र जैन आणि सुदर्शन शेट्टी | फोटोग्राफी: रहाब अल्लाना आणि रवी अग्रवाल.

त्या व्यतिरिक्त अनेक विशेष प्रोजेक्ट प्रदर्शित करण्यात येतील, जे नॅन्सी आडजाणिया, अनुरूपा रॉय, एचएच आर्ट स्पेसेस, St+art इंडिया फाऊंडेशन, आराधना सेठ आणि विद्या शिवदास तसेच इतर अनेकांद्वारे क्युरेटेड आहेत.

सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल हा एक सर्वसमावेशक आणि सहयोगी मंच आहे, जो कोर फेस्टिव्हल प्रोग्रामिंगचा एक भाग म्हणून भारतातील होतकरू कलात्मक समुदाय निर्माण करण्यावर व त्याचे संगोपन करण्यावर तसेच वेगवेगळ्या शाखांमध्ये कलात्मक संवाद स्थापित करण्यावर आणि सदरीकरणाच्या, दृश्य आणि पाक कलांना मंच पुरवण्यावर लक्ष केंद्रित करतो. दक्षिण आशियाई भागातील

कलांचे प्रदर्शन करणार्‍या या उत्सवात दक्षिण आशियाई देशांतील कलाकार आणि जगभरातील परफॉर्मर्सचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे या उत्सवाचा नीटनेटका अनुभव घेता या यासाठी लवकरच सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये नोंदणीविषयक सगळी माहिती, इव्हेंट कॅलेंडर, महत्त्वाचे अपडेट्स इ. असेल. जेथे शक्य असेल तेथे कागद आणि प्लॅस्टिकचा कमीत कमी उपयोग करून आणि सेवा क्षेत्रात व वर्कशॉप्सच्या बाहेर जागोजागी कचर्‍याचे डबे ठेवून तसेच कचर्‍याच्या व्यवस्थापनाचा विचार करणार्‍या कार्यशाळांमध्ये या कल्पना प्रोग्रामिंगचा एक भाग म्हणून सामील करून तसेच ईको-फ्रेंडली अन्न आणि जीवनशैलीचे पर्याय देऊन हा उत्सव जास्तत जास्त ईको-फ्रेंडली बनवण्याचा प्रयत्न आहे.

या उत्सवात गोव्याच्या सांस्कृतिक वारशाच्या प्रचारासाठीही काही खास प्रोजेक्ट असतील अशी योजना करण्यात येत आहे. विवेक मेनेझिस, खास प्रोजेक्टस क्युरेटर मुंडो गोवा क्युरेट करतील. हा प्रोजेक्ट गोव्याच्या भागातून गेलेल्या आंतरराष्ट्रीय कलाकारांचे एकत्र येणे साजरे करतो. कलाकार, लेखक आणि प्रज्ञावंत या अनोख्या सांस्कृतिक रूपरेषेतून अस्तित्वाचे आणि वारशाचे अनंत, विविध प्रकार अधोरेखित करून त्या ठेवीला आदरांजली वाहतील. सहभागी कलाकार आहेत- अमृता पाटील, अॅन्टोनियो डी कॉस्टा, अरुणा डीसूझा, अंजली आरोंडेकर, ब्रेंडन फर्नांडिस, सोलोमान सूझा, सरजीओ सांतीमानो आणि इव्हो डी फिगेरेडो.

लिना व्हिंसेंट आणि अक्षय महाजन हे रहाब अलाना यांच्या सहयोगाने गोवा फॅमिलिया नामक एका भल्या मोठ्या प्रोजेक्टचे क्युरेटिंग करतील. या प्रोजेक्टचा उद्देश आहे, गोवा आणि गोवेकरांच्या सामाजिक-सांस्कृतिक पाऊलखुणांचे इतिवृत्त लिहिणे. छायाचित्रे, पोस्टकार्ड्स, वडीलोपार्जित वारसा आणि संस्मरणे यांसारखे भौतिक साहित्य आणि मौखिक व मुद्रित इतिहास शोधण्याचा प्रयत्न करणारा हा संग्रह लोकांसाठी वैयक्तिक आणि सामूहिक कथांचे योगदान देण्यासाठीचे एक सहभागी स्थान बनेल. या प्रोजेक्टचे संकलन सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल, डिसेंबर 2019 मध्ये प्रदर्शित केले जाईल.

पाककला क्युरेटर प्रल्हाद सुखटणकर ‘फार्मर्स मार्केट’ चे क्युरेटिंग करत आहेत. या उपक्रमाद्वारे गोवा प्रांतातील शाश्वत पाककलेत कृषी उत्पादनांचे स्थान दर्शविले जाईल. खुल्या आवाहनावर आधारित या उपक्रमात सहभागी उत्पादने, आंबवलेले व मुरवलेले पदार्थ, कलात्मक खाद्यपदार्थ आणि पेये, स्थानिक पाककृती किंवा अशा कोणत्याही पद्धती प्रदर्शित करू शकतील, ज्या या प्रांतात टिकवून ठेवण्यासाठीची जागरूकता निर्माण करण्यात मदत करतील, असा त्यांना विश्वास वाटेल. शाश्वततेबद्दल बोलायचे तर या महोत्सवात पंजिममध्ये सेंट इनेझ क्रीकच्या आसपास स्थायिक झालेल्या स्थानिक समुदायांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात येतील व त्यांना त्यांच्या आसपासच्या पर्यावरणात हे जलस्रोत बजावत असलेल्या भूमिकांबद्दल जागरूक करण्यात येईल. शेवटी, या कार्यशाळांनंतर क्रीकजवळच्या एका कम्युनिटी थिएटरमध्ये बेबींचेम कझार किंवा बेडकांचे लग्न या प्रसिद्ध कोंकणी कवितेवर आधारित नाटक बजावण्यात येईल. या नाटकाचे दिग्दर्शन करतील सुनील शानभाग व क्युरेशन असेल अरुंधती नाग यांचे.

कालांच्या माध्यमातून समुदाय-प्रेरित आणि समुदायांचे लर्निंग यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या जनादेशानुसार, हा महोत्सव सर्व वयोगटातील लोकांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित करेल. न्होई, ज्याचा अर्थ कोकणी भाषेत नदी असा होतो, हा रिया डीसूझा आणि एलिझाबेथ केम्प यांनी क्युरेट केलेला प्रोजेक्ट आहे. हा मंडोवी नदी, तिच्याबद्दलच्या व तिच्या आसपासच्या समुदायांबद्दलच्या कथा, त्यांच्या उपजीविका आणि निर्वाहाविषयी असून आज ही नदी ज्या अनेक समस्यांचा सामना करते आहे त्याविषयीही आहे. केवळ लायब्ररी नेटवर्कच्या मदतीने बनेलल्या या प्रोजेक्टमध्ये गोव्यातील 13 विविध समुदाय सामील आहेत. चित्रांची मालिका आणि गोष्टी गोळा करण्यासाठी योजलेल्या कार्यशाळांमधून तो व्यक्त झाला आहे.

या प्रसंगी सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशनचे पालक संस्थापक श्री. सुनील कांत मुंजाल म्हणाले, “आम्ही जेव्हा सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल सुरू केले, त्यावेळी मूलतः दक्षिण आशियाई प्रांतातील कलांमध्ये सामग्र्याने असलेला समन्वय प्रदर्शित करण्याचे आमचे व्हिजन होते. कला अधिक सुलभतेने उपलब्ध आणि समावेशक व्हाव्यात आणि अगदी अनपेक्षित ठिकाणी असलेल्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी आमची इच्छा होती. त्या दृष्टीने गोव्यात एक अतिरिक्त कला केंद्र उभारण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हे असे स्थान असेल, जेथे आम्ही डिसेंबरमध्ये आठ दिवसांसाठी अनेक कला प्रेमी लोकांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकू.”

चौथ्यांदा पुन्हा एकदा गोव्यात येण्याबद्दल सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशनच्या संचालिका श्रीमती स्मृती राजगढिया म्हणल्या, “या महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीत अनेक वैविध्यपूर्ण आवाज सपाटीवर येतील अशी आशा आहे. आर्काइव्हल शोज पासून ते प्रायोगिक प्रोजेक्टसपर्यन्त, कमिशण्ड वर्क पासून परफॉर्मन्स आर्टपर्यन्त सर्वच बाबतीत आम्ही सर्वांना सामावून घेणार्‍या एका मजबूत प्रोग्रामची उभारणी करण्याचा जनादेश आणखी पुढे घेऊन जात आहोत. कालांकडे लक्ष वेधण्याच्या आणि त्यांना दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याच्या व्हिजनसह आम्ही परतत आहोत. आम्ही प्रोग्रॅम्सचा असा एक समग्र संच सादर करू इच्छितो, तो तुम्हाला आकर्षित करेल, जो अनुभवात्मक असेल आणि ज्यात सृजनशीलता व नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून विचार मांडले जातील.”

नेहमीप्रमाणे, कलात्मक गुणवत्ता आणि क्युरेशनल इन्टिग्रिटीसह समावेशक, शैक्षणिक आणि सहज उपलब्ध प्रोजेक्टस मार्फत कला क्षेत्रात नेतृत्व जोपासण्यासाठी सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल वचनबद्ध आहे. यातील खास प्रोजेक्ट्स प्रोग्रामिंग विशेषत्वाने विविध भौगोलिक क्षेत्रात लोक कलेला कसा प्रतिसाद देतात त्यात बदल करण्यावर लक्ष केन्द्रित करतात.

कलात्मक बाजूबरोबरच ह्या महोत्सवात जास्तत जास्त लोकांना सामील करून घेण्याचे लक्ष्य आहे. अनेक वर्कशॉप आणि सिद्धान्त शाह यांच्या सेन्सेस 4.0 सारख्या विशेष प्रोजेक्ट्समार्फत अधिक कलात्मक समावेशकता आणि कलांची उपलब्धता प्रदान करण्याचा मानस आहे. हे वर्कशॉप म्हणजे स्पर्शसंबद्ध कला, वर्कशॉप, क्युरेटेड वॉक आणि अॅक्टीव्हिटीजचे संमिश्रण असेल, ज्यामुळे हा महोत्सव विकलांग लोकांसाठी आणि स्थानिक शाळकरी मुलांसाठी देखील जास्त सोयिस्कर असेल. यावर्षी फोकस असेल मानसिक स्वास्थ्यावर. या महोत्सवाकडे 2019 साठी अधिक मजबूत स्वैच्छिक योजना आहे व देशभरातून व विशेषतः गोव्यातून स्वयंसेवक मिळाले आहेत, ज्यांना या महोत्सवासाठी आधीच संचालनासाठी सखोल प्रशिक्षण देण्यात येईल.

15 ते 22 डिसेंबर 2019 दरम्यान पंजिम, गोवा येथे सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलला जाण्यासाठी www.serendipityartsfestival.com येथे ऑनलाइन नोंदणी करा. प्रवेश निःशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे.