सेरेना विल्यम्स आई झाली

0
964
टेनिसविश्वाची सम्राज्ञी सेरेना विल्यम्स आई झाली आहे. सेरेनानं  मुलीला जन्म दिला आणि व्हिनसनं आपण मावशी झाल्याची ‘गुड न्यूज’ शेअर केली. सेरेनाला कन्यारत्न झालं आणि घरात आनंदाला उधाण आलं. अमेरिकन ओपनमधील तिसऱ्या फेरीचा सामना संपल्यानंतर व्हिनस विल्यमनं मुलाखतीतून या बातमीला दुजोरा दिला. त्याआधीच सेरेनावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला होता.

जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सेरेना विल्यम्स अजिंक्य ठरली होती. विक्रमी २३व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर तिनं नाव कोरलं होतं. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिनं एक फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केला होता. त्यावर ‘२० आठवडे’ अशी कॅप्शन दिली होती. त्याचा अर्थ सेरेनाच्या प्रवक्त्याने थोड्याच वेळात सांगितला, तेव्हा तिचे चाहते चक्रावले, चमकले. सेरेना २० आठवड्यांची गर्भवती असल्याची बातमी त्यानं दिली. म्हणजेच, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेवेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती.या स्पर्धेनंतर सेरेना ‘मॅटर्निटी लिव्ह’वरच होती. ती, तिचा जोडीदार अॅलेक्स ओहॅनियन आणि विल्यम्स कुटुंबीय नव्या सदस्याची आतुरतेनं वाट बघत होतं.