सेरेंडिपिटी कला महोत्सव गोवा २०१७ अंतर्गत भव्य आदिल शहा पॅलेसमध्ये कलाविष्कारांची मांदियाळी

0
735

 जगभरातील प्रेक्षकांना थक्क करणारे विविध परफॉर्मन्सेस 

दहा ठिकाणे, ९०० कलाकार, ७० मैफली, अत्याधुनिक रंगमंच आणि अद्वितीय सादरीकरण

पणजी: यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर कधीही सादर न केलेले
कलाविष्कार घेऊन गोव्यातील रसिक कला प्रेक्षकांना थक्क करून टाकण्यासाठी `सेरेंडिपिटी कला
महोत्सव २०१७` हा क्रांतीकारी कला महोत्सव सज्ज झाला आहे. या महोत्सवाच्या
उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
होते. त्यांच्यासह, सेरेंडिपिटी आर्ट्स फाऊण्डेशन गोवा २०१७ चे संस्थापक व वरीष्ठ अधिकारी
सुनिल मुंजाळ, दालमिया भारत समुहाचे  दालमिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कॉर्पोरेट
अफेअर्स विभागाचे प्रमुख व उपाध्यक्ष  अमीत निवसरकर ही ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. हा
महोत्सव १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०१७ या कालावधीत रंगणार असून या महोत्सवामुळे पणजी
शहराला एक नवे रूपडे बहाल होणार आहे. पणजीतील अनेक ठिकाणी हा महोत्सव रंगणार असून
यात भव्य रंगमंचांवर ७० कलाप्रकारांतील परफॉर्मन्सेस सादर करण्यात येणार आहेत. या
महोत्सवासाठी स्थानिक प्रशासनाकडून दळणवळणाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सदर
उपक्रमाच्या माध्यमातून नावाजलेल्या कलाकारांसोबतच नवोदित कलाकारांनाही आपली कौशल्ये
सादर करण्याची संधी एकाच व्यासपिठावरून मिळणार आहे. मांडवी नदीच्या किनार्‍यावर
साजर्‍या होणार्‍या या महोत्सवाचे यंदाचे रूप अधिक भव्य, अधिक विकसित आणि अनेक
परफॉर्मन्सेसनी नटलेले असणार आहे.
कलाप्रेमींची कल्पकता नजरेपुढे ठेऊन तसेच, जगाचा एका वेगळ्या अद्वितीय संहितेकडे सुरू
असलेला प्रवास लक्षात घेऊन या महोत्सवाची दिनचर्या ठरवण्यात आली आहे. लिलीट दुबे आणि
अनुराधा कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी तयार केलेल्या आगळ्यावेगळ्या शोच्या
माध्यमातून सांस्कृतिक पाककलेचे सुंदर दर्शन या महोत्सवातून प्रेक्षकांना पहायला मिळणार
असून रणजित होस्कोटे आणि रियाज कोमू या कलाकारांच्या वेगळ्या कलांचा आस्वादही घेता
येणार आहे. दिनेश खन्ना आणि प्रशांत पणजीयार यांच्या सुरेख छायाचित्रणाचा अनुभव तर
प्रेक्षकांना थक्क करणारा असेल. तसेच, ओडेटी मास्करहॅन्स आणि मनू चंद्रा या दोन चमकदार

शेफ्सच्या पाककलेतून गोव्याच्या स्थानिक खाद्यसंस्कृतीबरोबरच आंतरराष्ट्रीय पाकशास्त्राची चव
प्रेक्षकांना घेता येणार आहे. भारतीय तसेच,  आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरील प्रसिद्ध संगीत
कलाकारांच्या साथीने गोव्यातल्या संगीतप्रेमींचे कान तृप्त करण्यासाठी तसेच, भारतीय आधुनिक
व पारंपरिक संगीतकलेचा मिलाफ साधण्यासाठी संजीव भार्गव, तनुश्री शंकर, शुभा मुद्गल आणि
रणजित बारोट या ज्येष्ठ कलाकारांनी एकत्र येऊन खास सांगीतिक मैफलींचे आयोजन या
महोत्सवासाठी केले आहे. या महोत्सवातल्या अन्य परफॉर्मन्सेसमध्ये, भारताला अनेक दिग्गज
आणि सुरेल कलाकार देणार्‍या `जॅझ` काळातल्या संगीतावरील मैफलींचा समावेश आहे.
एकूण ८ दिवस चालणार्‍या, विविध परफॉर्मन्सेस आणि मैफलींनी सजलेल्या या महोत्सवात
अंतर्भूत असलेले काही खास उपक्रम खालीलप्रमाणे –
अ नाईट इन हार्लेम – जॅझचा सुवर्णकाळ आणि त्या काळातल्या आधुनिक संगिताचे नजराणे पेश
करणार्‍या नाईट क्लब्सची वैशिष्ट्ये पुन्हा नव्याने मांडली आहेत रणजित बारोट यांनी. यातून
प्रसिद्ध गायक, वादक आणि कोरस रिदमसह संगीताचा अद्वितीय नजराणा रसिक प्रेक्षकांपुढे
खुला होणार आहे. जॅझच्या जन्मस्थळाकडे जाणारा अनोखा प्रवास मंत्रमुग्ध करणार्‍या
परफॉर्मन्सेससह अनुभवायला मिळणार.
यंग सबकॉण्टिनेण्ट – रियाझ कोमू यांचे हे सादरीकरण असून विलग झालेल्या राजकीय
सीमारेषांमध्ये लुप्त झालेल्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन यात कलाकारांच्या माध्यमातून करून
देण्यात येणार आहे. यात विविध सांस्कृतिक कलाकार आणि नेत्यांनी तयार केलेल्या शिल्पाकृती,
वास्तू आणि तैलचित्रांचा समावेश करण्यात येणार आहे.
पुरूष – तनुश्री शंकर यांनी रचलेल्या या नृत्याविष्कार मैफलीच्या माध्यमातून समाजातील जुन्या
रुढी व परंपरांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. शारीरिक ताकद आणि पुरूषी अहंपणाविरुद्ध
प्रेक्षकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा परफॉर्मन्स रचण्यात आला आहे.
द म्युझिक स्टॉप्ड, बट वुई आर स्टील डान्सिंग – प्रशांत पणजीयार यांची निर्मिती असलेल्या या
परफॉर्मन्समध्ये गोव्यातल्या काही जुन्याजाणत्या व प्रसिद्ध संगीतकारांच्या छायाचित्रांचे पुनर्मुद्रण
आहे. जॅझ काळात छायाचित्रण रसिकांना पुन्हा-पुन्हा रमता यावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात
येत आहे. पूर्वीच्या काळातल्या भारतीय जॅझ सिनरीची आठवण यामुळे रसिक प्रेक्षकांना होणार
आहे.
सेरेंडिपीटी बेअरफूट स्कूल ऑफ क्राफ्ट्स – मेड इन गोवा – अन्नपूर्णा गेरीमेल्ला यांच्या
कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात हस्तकला, स्थापत्यशास्त्र आणि शिक्षण यांचे दर्शन
प्रेक्षकांना होणार आहे. स्थापत्यशास्त्रविषयक मॉडेल्सच्या विकासासाठी तसेच, शाश्वत शैक्षणिक

व्यासपिठाच्या उभारणीसाठी या उपक्रमात संकल्पनात्मक डिझाईन्स सादर करण्यात येणार आहेत.
गोव्याच्या मऊसूत वाळूने नटलेल्या समुद्रकिनार्‍यांसह तेथील आनंददायी वातावरणात रसिक
प्रेक्षकांना मोहवून टाकण्यासाठी वर नमूद केलेल्या कार्य़क्रमांव्यतिरिक्त इतरही अनेक सांगीतिक,
प्रेक्षणीय मैफली या महोत्सवांतर्गत सादर करण्यात येणार आहेत.
एसएएफ – गोवा २०१७ महोत्सवातील कार्यक्रम व संहिता उत्कृष्ट व्हावी, यासाठी या महोत्सवाच्या
आयोजन मंडळाने तासन्तास मेहनत घेतली आहे. या महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी एकूण १०
रंगमंचांवर अनेक परफॉर्मन्सेस सादर करण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रेक्षकाला वेगळा आणि
क्रांतीकारी अनुभव देण्यासाठी महोत्सवाच्या आयोजकांनी खास दळणवळणसेवा प्रस्थापित केली
आहे. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी सहज पोहोचता यावे, हा त्यामागील उद्देश आहे.
या प्रसंगी बोलताना सेरेंडिपीटी कला न्यासाचे वरीष्ठ अधिकारी, संस्थापक व ज्येष्ठ उद्योजक
सुनिल मुंजाळ म्हणाले, “दैवदत्त योगायोग (सेरेण्डीपीटी) या शब्दाशी साधर्म्य साधणार्‍या आणि
ध्येयशील महोत्सवाच्या आयोजनासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. हे राज्य नैत्रसुख देते आणि
इथले हवामानही छान आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, आज अनेक वर्षे विविध संस्कृती
गोव्यात एकत्र नांदत आहेत. हे राज्य सर्वसमावेशी आहे. म्हणूनच, गेल्या वर्षीही आम्ही हा
महोत्सव गोव्यातच साजरा केला. पणजीतल्या मांडवी नदीच्या किनार्‍यावरच वसलेली सर्व
ठिकाणे आम्ही याहीवर्षी निवडली आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा महोत्सव अधिक मोठा आहे
आणि आणखी चांगलाही होईल, अशी आशा आहे. भारताच्या परफॉर्मिंग आर्ट्सचा वैविध्यपूर्ण
वारसा पुन्हा जगण्याचा सेरेंडिपीटी महोत्सवाचा मूळ हेतू आहे.“
एसएएफ – गोवा २०१७ महोत्सवाबाबत आपले मत व्यक्त करताना  मुख्यमंत्री
मनोहर पर्रीकर म्हणाले, “गोव्यातल्या पर्यटन हंगामाला या महोत्सवामुळे आणखी प्रोत्साहन
मिळत आहे. गोव्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी या
महोत्सवाची नक्कीच मदत होणार आहे. आम्ही गोव्यात नेहमीच कलाकारांचे स्वागत करतो
आणि कलाकारांनाही येथील प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करताना खूप आनंद होतो. एसएएफ
– गोवा २०१७ पर्यंत, आजवर गोव्यात अनेक सांगीतिक महोत्सव व चित्रपट महोत्सव
यशस्वीरित्या पार पडले आहेत. गोव्यात आयोजित होणारा हा पहिलाच परफॉर्मिंग आर्ट्स
महोत्सव आहे. आजवर कधीही कोणत्याही कला महोत्सवाने निर्माण झाले नाही, असे सुरेल आणि
सुंदर वातावरण या महोत्सवामुळे गोव्यात निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय
संस्कृतीतील अनेक कलाकारांच्या दिमाखदार परफॉर्मन्सेसच्या सादरीकरणाबाबत मी खरोखर
उत्सुक आहे. सर्व कलाकारांचे मी अत्यानंदाने गोव्यात स्वागत करीत आहे.“

परफॉर्मिंग आर्ट्स, पाकशास्त्र आणि सांस्कृतिक कलांच्या जागतिक व्यासपिठावर भारताचे नाव
नव्याने कोरण्यामध्ये सेरेंडिपीटी आर्ट्स फेस्टीव्हल – गोवा २०१७ चा मोठा वाटा असणार आहे.
एसएएफ – गोवा २०१७ महोत्सवाची निर्मिती करणार्‍या  मुंजाळ यांच्या वैयक्तिक
कलाप्रेमातून या महोत्सवाला आकार आला आहे. यंदा एसएएफ – २०१७ च्या माध्यमातून
दृश्यकला, विविध कलाप्रकार आणि डिस्प्ले याच्या सहाय्याने कलेच्या सर्व कक्षा रुंदावण्याचा
प्रयत्न करण्यात येणार आहे. संगीत, नृत्य, नाट्य, दृश्यकला आणि पाककला या विविध
कलाप्रकारांनी नटलेल्या यंदाच्या महोत्सवात अद्वितीय परफॉर्मन्सेसचा सुरेल मिलाफ साधला
जाणार आहे.
एसएएफ २०१७ मध्ये खालील कलाकारांची निर्मिती असलेले काही सुंदर प्रकल्प सादर करण्यात
येणार आहेत –
दिनेश खन्ना आणि प्रशांत पणजीयार (छायाचित्रण), रणजित होस्कोटे आणि रियाझ कोमू
(दृश्यकला), मनू चंद्रा आणि ओडेट मास्करहान्स (पाककला), संजीव भार्गव आणि तनुश्री शंकर
(नृत्य), लिलीट दुबे आणि अनुराधा कपूर (नाट्य) आणि शुभा मुद्गल व रणजित बारोट (संगीत)

सेरेंडिपिटी आर्ट्‌स फेस्टिवलविषयी

सेरेंडिपिटी आर्ट्‌स फेस्टिवल हे डिसेंबर महिन्यात आठ दिवसांच्या काळात गोव्यातील पणजी येथील
उत्साहाने सळसळणार्‍या स्थळांवर भरणारे विविध कलाशाखांचे प्रदर्शन आहे. उत्कृष्ट दर्जाचे कलावंत
आणि काही संस्थात्मक व्यक्तींचा समावेश असलेल्या मंचाने आखणी केलेला हा महोत्सव म्हणजे
भारतातील कलाजगतावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या आशेसह आकाराला आलेला
दीर्घकालीन सांस्कृतिक प्रकल्प आहे. एसएएफ २०१७ हा महोत्सव जोरदार गर्जनेसह परत आला आहे. हे
वर्ष आहे ते मर्यादा ओलांडण्याचे- स्थळ, स्वरूप आणि प्रस्तुतीकरण या सर्वच बाबतीत एसएएफ १७ प्रयोग
करणार आहे. संगीत, नृत्य, रंगभूमी, दृश्यकला आणि पाककलेतील चमकदार कार्यक्रमांच्या रूपरेषेसह
यंदाचा हंगाम म्हणजे एक विशाल देखावा ठरेल.
याशिवाय या महोत्सवात कलाशिक्षण, कलेला आश्रय, संस्कृती, दोन कलाशाखांमधील संवाद आणि
कलेपर्यंत पोहोचण्यातील सुलभता या विषयांवरही चर्चा होईल. प्रदर्शन आणि सादरीकरणांच्या उत्साहवर्धक
कार्यक्रमांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक विषयांनाही स्थान दिले जाईल. या महोत्सवात कलेचे साधक
आणि प्रेक्षक अनेक पातळ्यांवर, मुबलक संधी उपलब्ध करून देणार्‍या जागी एकमेकांशी संवाद साधू
शकतील, कल्पनांचे आदानप्रदान करू शकतील आणि कलेमध्ये अर्थपूर्ण पद्धतीने स्वत:ला गुंतवून
घेण्याची प्रेरणा भारतातील युवावर्गाला देऊ शकतील.