सेपाक टेकरो फेडरेशन च्या चेअरमनपदी कवळेकर यांची बिनविरोध निवड

0
151
गोवा खबर : उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची ऑल इंडिया सेपाक टेकरो फेडरेशन च्या चेअरमन पदी बिनविरॊध निवड झाली आहे. ही निवड २०२० ते २०२४ च्या कालखंडासाठी झाली असून, कवळेकरांची निवड ही बिनविरोध झाल्याचे फेडरेशनतर्फे कळवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री कवळेकर हे मावळत्या समितीत वरिष्ठ उपाध्यक्षपदी होते.
नवी दिल्लीत झालेल्या फेडरेशनच्या वार्षिक आमसभेत ही निवड झाली. यावेळी व्यासपीठावर मावळते सरचिटणीस दहिया, उपाध्यक्ष टी. के. सिंग, नवनिर्वाचीत सरचिटणीस व्ही. गौडा, अध्यक्ष एस. आर. प्रेमराज, उपाध्यक्ष बिमल पाल आणि कोषाध्यक्ष के. बिश्त उपस्थीत होते. यावेळी गोव्यातून सेपाक टेकरो असोसिएशनचे शिष्टमंडळ म्हणून सचिव सुरज देसाई व कृष्णा खराडे उपस्थीत होते. दिल्लीत झालेल्या निवडणुकांत राष्ट्रीय फेडरेशनच्या मानद सरचिटणीसपदी सुरज देसाई यांचीही निवड झाली.
सेपाक टेकरो हा ऑलिम्पिक, आशियाई गेम्स, राष्ट्रीय स्पर्धा मध्ये खेळला जाणारा आशियायी खेळ २००० मध्ये उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या अध्यक्षतेखालीच गोव्यात आणला गेला. त्यांच्याच विशेष प्रयत्नांच्या जोरावर हा खेळ शालेय क्रिडा म्हणून सामावून घेण्यात आला आणि अभ्यासक्रमाचा भाग बनला. २००० पासून पुढे ३ वेळा राज्यस्तरीय असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर कवळेकर हे राहिले आहेत. आताही ते राज्य समितीच्या अध्यक्षपदावर आहेत.
आत्तापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात ७ वी, १० वी व १४ वी सब जुनिअर स्पर्धा तसेच विविध राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा गोव्यात आयोजीत केल्या आहेत.  त्यांचे असोसिएशन मधील चांगले काम बघूनच त्यांची फेडरेशनच्याचेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे फेडरेशनच्या सूत्रांनी यावेळी सांगितले.
यावेळी दिल्लीतून बोलताना कवळेकर म्हणाले, गोवा पोलिसांची सेपाक टेकरो टीम यापुढे असणार आहे. तसेच सैन्यदलातही सेपाक टेकरो यापुढे बऱ्यापैकी खेळला जाणार आहे. त्याबाबत माझे रक्षा राज्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. सेपाक टेकरो खेळाला माझ्या पुढच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत एक नवीन दिशा देण्याच्या प्रयत्न करणार आहे. गोवा या आधीच राष्ट्रीय स्तरावर या खेळात अव्वल राहिलेला असून आता हा खेळ देशात अजून लोकप्रीय होण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत.