सेन्सॉर मंडळाचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत नाही:पर्रीकर

0
941

गोवा खबर: सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत  नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज  येथे पत्रकारांना सांगितले.

पर्रीकर म्हणाले, की पद्मावत चित्रपटाकडे सध्या सेन्सॉर मंडळाचे प्रमाणपत्र नाही, अशी माहिती मिळते. सेन्सॉरचे प्रमाणपत्र नसताना सिनेमा दाखविताच येत नाही.  डिसेंबरमध्ये हा चित्रपट गोव्यात दाखविण्याची मागणी झाली होती, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे क्लेशकारक ठरले असते. कारण त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी गोव्यात असते. यापुढेही जर सेन्सॉरचे प्रमाणपत्र असेल तर त्याविषयी विचार करता येईल, पण आताच निर्णय घेता येत नाही. त्यावेळची परिस्थिती पाहावी लागते. पोलीस खाते ते काम करील.

राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत दि. 22 फेब्रुवारीला सादर केला जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले. 21 मार्चपर्यंत विधानसभा अधिवेशन चालेल, असे पर्रीकर यांनी नमूद केले. मंत्रिमंडळाची बुधवारी येथे बैठक झाली. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन  19 फेब्रुवारीला बोलवावे असा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल. 22 रोजी आपण वेगळ्य़ा स्टाईलचा अर्थसंकल्प सादर करीन. अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. प्रत्यक्ष बैठका येत्या 24 रोजी सुरू होतील. अधिवेशनात पंधरा दिवस पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, येत्या 16 रोजी ओपिनीयन पोलचा दिवस हा अस्मिता दिवस म्हणून गोवा सरकारतर्फे साजरा केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यावेळी जनमत कौल झाला होता. जनमत कौल म्हणजे काय याविषयी जागृती व्हावी व सर्वाना त्याचे लाभ कळावेत म्हणून मडगाव येथे होणा:या सोहळ्य़ात सरकार सहभागी होईल. मडगावमधील विद्याथ्र्यानाही त्या सोहळ्य़ात सहभागी होण्याची सूचना सरकार करील. जनमत कौलावेळी कोण कुठच्याबाजूने होते, त्याविषयी आपण काही बोलत नाही पण जनमत कौल हा विषय महत्त्वाचा आहे. कार्यक्रमाची रुपरेषा मंत्री विजय सरदेसाई ठरवतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.