सेक्स रॅकेट मधील युवतींची डिलिवरी दुचाकीवरुन

0
1167
कळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;एका युवतीची सुटका,एका दलालाला अटक

गोवाखबर:कळंगुट पोलिसांनी धडक कारवाई करत सेक्स रॅकेट उध्वस्त केले. उत्तर प्रदेश येथील युवतीची सुटका करतानाच उत्तर प्रदेश येथील एका दलालाच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.सेक्स रॅकेटसाठी दलाल अलीकडे  दुचाकींचा वापर करू लागले आहेत.ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वॉट्स ऍपचा वापर केला जात आहे. युवतीचे फोटो  पाठवून सौदा निश्चित झाल्यावर युवतीला ठरलेल्या ठिकाणी पोचवण्यासाठी दुचाकीचा वापर केला जाऊ लागला आहे.या प्रकरणात देखील दलालाने याच पद्धतीचा वापर केल्याचे आढळून आले आहे.

कळंगुट परिसरात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची पक्की खबर कळंगुट पोलिसांना मिळाली होती.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांना सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून रॅकेट उध्वस्त करण्यासाठी हालचाली सुरु केल्या.
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालाचा नंबर  पोलिसांच्या हाती लागला होता.पोलिसांनी बनावट ग्राहक बनून त्या नंबरवर संपर्क साधला. पोलिसांनी बनवाट ग्राहक बनून युवती पूरवण्याची मागणी केली. या दरम्यान दलालाचे लोकेशन पोलिसांना समजले. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली स्कॅन इंडिया या एनजीओचे प्रतिनिधी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक नेमून तीवईवाडो येथे सापळा रचण्यात आला.
तो दलाल युवतीला घेऊन तीवईवाडो येथे पोचताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकून दलाल आणि पीडित युवतीला पोलिस स्थानकात आणून त्या युवतीचा जबाब नोंदवून घेतला.त्यानंतर उत्तर प्रदेश येथील त्या युवतीची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आली.
पोलिसांच्या तावडीत सापडलेला दलाल हा गाझियाबाद,उत्तर प्रदेश येथील 27 वर्षीय इरफान खान असून कळंगुट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.त्याच्या कडून GA-03-AE-7359 ही दुचाकी,रोख 20 हजार रुपये,2 मोबाइल आणि इतर साहित्य जप्त केले आहे.संशयिताला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कळंगुट पोलिसांच्या पथकात महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस,पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष मालवणकर,कोस्टेबल विद्यानंद आमोणकर,लक्ष्मण पाटेकर,मिथिला बायेकर आणि एनजीओच्या  सदस्या रुथ डिक्रूझ यांचा समावेश होता.