सेक्स रॅकेटप्रकरणी मार्सेलो पॅलेस गेस्ट हाऊसला सील

0
1093

पणजी:आगरवाडा- कळंगुट येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केल्यानंतर कळंगुट पोलिसांनी मार्सेलो पॅलेस गेस्ट हाऊसला सील ठोकले आहे. या गेस्ट हाऊसमधुन वेश्याव्यवसाचे दलाल सुत्रे हलवत होते. तसेच पीडित तरुणींची ओळखपत्रे पोलिसांना याच ठिकाणी सापडली होती. २३ ऑक्टोबरपासून या खोलीत तरुणींना डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांना या खोलीला सील ठोकले आहे.
कळंगुटमध्ये वेश्याव्यवसायासाठी वापरली जाणारी हॉटेल सील करण्याची ही तिसरी घटना आहे. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.