सूट दिलेल्या आस्थापनांच्या/उद्योगांच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत रुजू व्हावे

0
414

 गोवा खबर:राज्य व राष्ट्राला आवश्यक सेवा पुरवणाऱ्या सूट दिलेल्या आस्थापनांना / उद्योगांना एमएचएच्या आदेशानुसार काम करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयाने दिली आहे . सूट दिलेल्या आस्थापने / उद्योगाच्या व्यवस्थापनाने  जे कर्मचारी गोव्यामध्ये राहतात व ज्यांना सेवेत रुजू होण्यास सांगितले आहे ते आपल्या कामावर रुजू  होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तथापि, अशा आस्थापनांनी  / उद्योगांच्या व्यवस्थापनांनी  वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या कोव्हीड – 19 संबंधित सुरक्षा उपायांचे जसे की सॅनिटायझर्स, मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे.

अशा आस्थापनांची / उद्योगांची  या कालावधीत कामावर येणार्‍या कामगार / कर्मचाऱ्यांची   हेल्थ स्क्रिनिंग, वाहतूक व्यवस्था, आरोग्याशी संबंधित सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी असेल.