सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांसाठी डिजिटल मंचाचे सुरेश प्रभू यांच्याकडून अनावरण 

0
1044
The Union Minister for Commerce & Industry and Civil Aviation, Shri Suresh Prabhakar Prabhu launching the FIEO Global Linker, in New Delhi on April 17, 2018.

गोवाखबर:सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांना आपला व्यवसाय डिजिटाईज करता यावा आणि जागतिक समुदायाबरोबर ते जोडले जावेत यासाठीच्या FIEO GlobalLinker या डिजिटल मंचाचे अनावरण आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे केले.

या संकल्पनेसाठी प्रभू यांनी भारतीय निर्यातदार संस्था महासंघाचे (FIEO) अभिनंदन केले. या उपक्रमामुळे निर्यातीला चालना मिळेल तसेच कला आणि कारागीर बाजाराशी जोडले जातील, असे प्रभू यांनी सांगितले.

लवकरच किमान 300 भौगोलिक संकेतांकांची नोंदणी केली जाणार असून यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असे प्रभू यांनी सांगितले.