सुवर्णमहोत्सवी ‘इफ्फी’ साठी नोंदणी

0
837

 गोवा खबर:इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 50 वे वर्ष असल्याने यंदाचा महोत्सव विशेष आहे. 

गोव्यातील पणजी इथे 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान यंदाचा महोत्सव होणार असून 76 देशांमधले 200 हून अधिक उत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात 26 फिचर फिल्म्स आणि 15 नॉन फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. वेगवेगळ्य भाषांमधले यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेले 12 महत्वाचे चित्रपट महोत्सवाच्या सुवर्णवर्षानिमित्त दाखवण्यात येणार आहे. चित्रपटनिर्मितीतल्या सर्वोत्तम कलेचा सन्मान करण्यासाठी जगभरातल्या चित्रपटांना सामायिक मंच पुरवणे हे इफ्फीचे उद्दिष्ट आहे. इफ्फी हा भारताचा सर्वाधिक प्रतिष्ठेचा महोत्सव असून, आशियातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे.

 इफ्फी महोत्सवाचे वार्तांकन करण्यास इच्छुक असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी http://my.iffigoa.org/ लिंकवर नोंदणी करावी. यासाठी अंतिम मुदत 10 नोव्हेंबर 2019 आहे. अधिक माहितीसाठी पत्र सूचना कार्यालय, गोवा यांच्याशी संपर्क साधावा. मेल आयडी: iffi-pib@nic.in, दूरध्वनी क्रमांक: 0832-2226929.