सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठीच्या ओपन एअर स्क्रिनिंगची यादी जाहीर

0
593

जॉगर्स पार्क आणि मिरामार बीच याठिकाणी १४ चित्रपट दाखवले जाणार
 

गोवा खबर:सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. सिनेरसिकांना चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी ओपन एअर स्क्रिनिंगचे आयोजन केले जाते. यंदाच्या ओपन एअर स्क्रिनिंगची संकल्पना ‘जॉय ऑफ सिनेमा’ ही आहे.  यात भारतीय पॅनोरमा विभागातील चित्रपटांबरोबरच गाजलेले चित्रपट दाखवले जातात.  

यावर्षी 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान जॉगर्स पार्क, अल्तिनो आणि मिरामार बीच याठिकाणी ओपन एअर स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. हे सर्वांसाठी खुले असून यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, तसेच यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

जॉगर्स पार्क, अल्तिनो येथे दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची यादी:

 • चलती का नाम गाडी (1958)
 • पडोसन (1968)
 • अंदाज अपना अपना (1994)
 • हेरा फेरी (2000)
 • चेन्नई एक्सप्रेस (2013)
 • बधाई हो (2018)
 • टोटल धमाल (2019)

मिरामार बीच याठिकाणी दाखवणारे चित्रपट:

 • नाचू या कंपूसार (कोकणी)
 • सुपर 30 (हिंदी)
 • आनंदी गोपाल (मराठी)
 • उरी : द सर्जीकल स्ट्राईक (हिंदी)
 • हेलारो (गुजराती)
 • गली बॉय (हिंदी)
 • F2 – फन अँड फर्सट्रेशन (तेलुगू)