सुवर्णमहोत्सवी इफ्फीत सुवर्णमयूर विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन

0
693

गोवा खबर:सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महोत्सवात सुवर्णमयूर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे. यात विविध आठ देशांचे आठ चित्रपट दाखवले जाणार आहेत. 

1965 च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सुवर्णमयूर विजेता चित्रपट ‘गॅम्परलीया’ या चित्रपटाने याचा शुभारंभ होणार आहे. समीरा मखमलबीफ दिग्दर्शीत ‘ऍट फाईव्ह इन अफ्टरनून’, गौतम घोष दिग्दर्शीत ‘मोनर माणू’श, अलेक्जांडरो दिग्दर्शीत ‘पोरफिरीओ’, जेम्स आयव्हरी यांची ‘दी बोस्टोनियन्स’, तियान मिंग वू दिग्दर्शीत चीनी चित्रपट ‘दी किंग ऑफ मास्कस’, कझाक चित्रपट ‘टुपला’न, आंद्रे झियांगीनस्तेव्ह दिग्दर्शीत ‘लेव्हिएथन’ हे सुवर्णमयूर पुरस्कार विजेते चित्रपट दाखवले जाणार आहेत.