सुभाष शिरोडकरांना विजयी करून विकासाला साथ द्या:गुदींन्हो

0
674
गोवा खबर:शिरोडा विधानसभा पोटनिवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत सुभाष शिरोडकर व नरेंद्र सावईकर यांना प्रचंड मतांनी निवडुन द्या, असे आवाहन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी वाजे हळदय येथील बैठकीत केले. यावेळी  भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर,मंडळ अध्यक्ष सुरज नाईक,माजी जि .प.सदस्य नारायण कामत माजी पंज सुहास नाईक,पंच पल्लवी शिरोडकर,पंच मेघश्याम शिरोडकर,पंच शिवानंद नाईक उपस्थित होते .
शिरोडकर यांनी मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी पंक्षातर केले आहे.मतदार संघाचा विकास हेच ध्येय आहे असे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले.
 मंडळ अध्यक्ष सुरज नाईक यांनी बाहेरच्या व्यक्तीच्या अपप्रचाराला बळी पडु नका असे आवाहन केले. भाजपाला विजयी करण्यास आवाहन केले.