सुभाष वेलिंगकर आता होणार राजकारणात सक्रीय

0
2139

गोवा खबर:‘भारत माता की जय’च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती आपल्याला संस्थेचे संरक्षक या जबाबदारीतून एकमताने मुक्त केले असून राजकीय पक्षात कार्य करण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे आपण गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षात प्रवेश करीत असल्याची माहिती सुभाष वेलिंगकर यांनी दिली. काल  येथील स्वामी विवेकानंद सभागृहात राज्यातील सर्व तालुक्यांतील भारत माता की जय या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय मान्य करून आपण सक्रीय राजकारणात पूर्वानुभवाच्या आधारे जनतेची सेवा करणार आहे. गोवा सुरक्षा मंच पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार प्रादेशिक भाषेचा विषय आणि इंग्रजीला विरोध हा कायम राहणार आहे. गोव्याच्या समस्या सोडवण्यासाठी, गोव्याच्या हितासाठी राजकारणात उतरत आहे, असे वेलिंगकर यांनी यावेळी स्पष्ट केले.