सुपर स्पेशलीटीमधील समस्यांबाबत याचिकेतून लोकांच्या समस्या सूटतील : म्हांबरे

0
116
गोवा खबर : जीएमसी सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या कोविड वॉर्डात दाखल झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांच्या संदर्भात मी जनहित याचिका दाखल केली आहेे. ही याचिका माझ्या वैयक्तिक क्षमतेनुसार मंगळवारी 1 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती आपचे गोवा समन्वयक राहुल म्हांबरे यांनी दिली आहे.
म्हांबरे म्हणाले, सदर याचिकेत नातलगांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसणे, रूग्णांचा खाजगीपणा जपण्यासाठी पडद्याचा अभाव, घरात शिजवलेले अन्नपदार्थ आणण्यावरील बंधन, बसण्याची व्यवस्था आणि मोबाईल चार्ज पॉइंट्स यासारख्या विविध मुद्द्यांशी संबंधित आहे.
नातेवाईकांसाठी, स्वच्छतागृहांची गरज आणि इतर आवश्यक बाबी जसे की झेरॉक्स मशीन (ज्यामुळे सर्वत्र गैरसोय निर्माण होत होते) आणि कोविड रूग्ण आणि नातेवाईकांना त्रास होत होता. हायकोर्टाने बुधवार 2 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी केली आणि एक अंतरिम आदेश मंजूर केला, ह्यात पिण्याचे पाणी, गोपनीयता पडदे आणि बसण्याची व्यवस्था ह्या तीन तातडीच्या मुद्द्यांवर त्वरित पावले उचलण्याचे आदेश न्यायालयाने गोवा राज्य सरकारला दिले आहे, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.
मी जवळजवळ तीन आठवड्यांपूर्वी बांबोळी येथील जीएमसी सुपर स्पेशलिटी ब्लॉकला भेट दिली होती आणि मी माध्यमांद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे उपस्थित नातेवाईकांशी संवाद साधला होता आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, उत्तर गोवाचे जिल्हाधिकारी, राज्याचे आरोग्य सचिव आणि स्वत: मुख्यमंत्री हे सर्वजण सदर प्रश्न सोडविण्यात सपशेल अयशस्वी ठरले आहेत, असा आरोप म्हांबरे यांनी केला आहे.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या तातडीच्या सुनावणी आणि अंतरिम आदेशाबद्दल त्यांचा आभारी आहे. मला आशा आहे की ह्यामुळे कोरोनाबाधित गोमंतकीयांना तातडीने दिलासा मिळेल, असे सांगून म्हांबरे म्हणाले, गुरुवारी 10 जून रोजी पुढील आदेशांसाठी याचिका सुनावणीसाठी घेतली जाईल.