सीग्रामची इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू आता नवीन आकर्षक पॅकेजिंगमध्‍ये उपलब्‍ध

0
814

गोवा खबर : सीग्रामच्या इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू या उद्योगक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित ब्रॅण्‍डने त्‍यांच्‍या कूल न्‍यू ब्‍ल्‍यू पॅकेजिंगच्‍या सादरीकरणाची घोषणा केली. हे आकर्षक परिवर्तन व्हिस्‍कीचा आस्‍वाद घेणा-या ग्राहकांसाठी एक आनंददायी अनुभव असणार आहे.

देशभरातील लाखो ग्राहक इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यूची प्रशंसा करतात. वर्षानुवर्षे हा ब्रॅण्‍ड उल्‍लेखनीय किमान पॅकेजिंग देण्‍यासाठी ओळखला जात असून अनेक ग्राहकांमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय ठरला आहे. विभागातील विकासाला चालना देणारा हा गंतव्‍य ब्रॅण्‍ड असल्‍याचे यामधून दिसून येते. नवीन डिझाइन ब्रॅण्‍ड ओळखल्‍या जाणा-या विशिष्‍टपूर्ण प्रतिष्‍ठेमध्‍ये अधिक भर करते. नवीन रॉयल ब्‍ल्‍यू बाहेरील पॅकेजिंगचा उल्‍लेखनीय प्रिमिअम लुक आहे आणि नवीन डिझाइन केलेली स्‍लीक बॉटल त्‍यामध्‍ये अधिक आनंदाची भर करते.

या सादरीकरणाबाबत बोलताना पेरनॉड रिकार्ड इंडियाचे मुख्‍य विपणन अधिकारी कार्तिक मोहिंद्रा म्‍हणाले, ”इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यूची किमान प्रिमिअम डिझाइन सध्‍याच्‍या काळामध्‍ये सर्वोत्तम व अग्रणी आहे आणि विभागामध्‍ये नेहमीच पुढे राहिली आहे. म्‍हणूनच या ब्रॅण्‍डचे ग्राहकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. ग्राहकांच्‍या अपेक्षांनुसार सातत्‍याने सुविधा देण्‍याचा या नवीन सुधारित पॅकेजिंगच्‍या सादरीकरणामागील प्रमुख उद्देश आहे. या परिवर्तनाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही पॅकेजिंगच्‍या क्‍लासिक डिझाइनमध्‍ये नवीन बदल करत आहोत आणि समकालीन व उत्‍साही व्‍यक्तिमत्त्वाची भर करत आहोत, जी आमच्‍या सर्वसमावेशक ग्राहकांशी संलग्‍न असेल. पॅक ब्रॅण्‍ड फ्रँचायझी वाढवण्‍यासोबत नव्‍या उंचीवर घेऊन जाईल.”

सादर करण्‍यात आलेल्‍या नवीन पॅकला उच्‍चस्‍तरीय सादरीकरण मोहिमेचे पाठबळ मिळाले आहे. ज्‍यामध्‍ये लक्ष्‍य प्रेक्षकांचा संपूर्ण समावेश असेल आणि ‘दि कूल न्‍यू इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू’प्रती उत्‍साह वाढत जाईल.