सीएपीएफच्या सर्व जवानांना हवाई प्रवासासाठी गृह मंत्रालयाकडून मंजुरी

0
823

 

 

 

गोवा खबर:सीएपीएफ अर्थात केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांच्या सर्व जवानांना दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू या मार्गावरील हवाई प्रवासाचा हक्क मंजूर करण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे.

यात कर्तव्यावर असतांनाच्या प्रवासासोबतच सुट्टीसाठी घरी जाताना आणि घरुन परततानाचा प्रवासही समाविष्ट आहे. याचा तात्काळ फायदा सीएपीएफच्या कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि एएसआय अशा 7,80,000 जवानांना होणार आहे.