सीआरझेड शीथिल करण्याच्या प्रयत्नांना समुद्राचा दुसऱ्यांदा इशारा

0
1162

गोवाखबर : एकीकडे सरकार सीआरझेडचे नियम शीथील करण्यासाठी धड़पड़त असताना समुद्राने आपली लक्ष्मण रेषा दाखवून दिली आहे.ओखी नंतर काल पुन्हा समुद्राच्या पाण्याची पातळीत अचानक वाढ झाल्याने मोठय़ा लाटा उसळून किनाऱयावरील शॅकमध्ये पाणी घुसल्याने उत्तर गोव्यातील कांदोळी,कळंगुट, केरी,आश्वे किनाऱ्यांवरील शॅक्स मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेधशाळेने इशारा दिल्या नंतर सरकारी यंत्रणेने किनाऱ्यावरील शॅक्स मालक आणि मच्छीमारांना सतर्क केले होते.
रविवारी समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सच्या किचन मध्ये पाणी घुसल्याने दैनंदिन वापरासठी आणलेले काही  पदार्थ वाहून गेले. शॅक्स चालकांना  लाकडी पलंग, खुर्च्च्या वाचवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली.या पर्यटन हंगामातील ही दुसरी घटना आहे.यापूर्वी ओखी वेळी असेच नुकसान झाले होते.
उत्तर गोव्यातील केरी येथे सायंकाळी पाण्याची पातळी वाढून समुद्राचे पाणी थेट शॅकमध्ये घुसले.  एकूण सहा शॅकमध्ये पाणी घुसले. पर्यटक जेवणासाठी लाकडी पलंगावर, खुर्च्यांवर बसले होते. पाणी अचानक वाढल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. काही लाकडी पलंग पाण्यात बुड़ुन नुकसान झाले.
 समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने आश्वे-मांद्रे किनारी भागात वरपर्यंत पाणी आले होते. लाकडी पलंग ज्या ठिकाणी घातले होते तिथपर्यंत पाणी पोहोचले. धावपळ करून पलंग काढावे लागले.