सिल्क इंडिया एक्स्पोला पणजीमध्ये सुरुवात

0
1196

 हँडलूम समूह आणि सिल्क को-ऑपरेटिव सोसायटी एकाच ठिकाणी एकत्र

 अभिनेत्री मर्लिन डिसिल्वाने केले एक्स्पोचे उद्घाटन

गोवाखबर: हस्तशिल्पीचे कारागीर आणि वेवर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे सिल्क इंडिया
एक्स्पो 2018चे पणजीतील कन्वेनशन सेंटर, विस्तार इस्टेट्स, येथे 23 ते 28 फेब्रुवारी 2018 या
कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
अभिनेत्री मर्लिन डिसिल्वा यांनी या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केले. यानिमित्ताने त्या
म्हणाल्या की, `डिझायनर वेअरची इतकी वैविध्यता, साड्या आणि फॅशन वेशभूषा पाहणे
अतिशय आल्हाददायक आहे. खासकरून महिलांना एकाच ठिकाणी इतके विविध प्रकार पाहता
येणार आहेत. त्यांना आपल्या आवडीनुसार फॅशनेबल कपडे निवडून खरेदी करता येणार आहेत.
सिल्क एक्स्पो 2018चे आयोजक  अभिनंदन म्हणाले की, `गोव्यात दुसऱ्यांदा, सिल्क
साड्यांचे विणकार, हँडलूम समूह आणि सिल्क को-ऑपरेटिव सोसायटी यांनी आपली उत्पादने
सादर करत आहेत. विणकारांना प्रोत्साहन मिळावे आणि हँडलूम उद्योगक्षेत्राचा बाजारपेठात
विस्तार व्हावा या एकमेव उद्देशाने या हँडलूम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या
प्रदर्शनात सर्वोत्तम उत्पादने आणि विविध साड्यांचे प्रकार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
प्रदर्शनात 65 स्टॉल आहेत, यात हँड ब्लॉक प्रिंट साड्या, सूट आणि सिल्क बेड कव्हर, डिझायनर
कपडे आणि बॉर्डर, लेझ, कुर्त्या हाताने विणलेले मटका आणि असम मुगा फॅब्रिक, अपूर्वा सिल्क
साड्या, बलुचुरी साड्या, एम्ब्रॉयडरी डिझायनर सिल्क साड्या आणि ड्रेस मटेरियल्स, भागलपूर
सूट, प्रिंटेड सिल्क साड्या, रेश्मी प्लेन आणि बुट्टी साड्या, कर्नाटक सिल्क साड्या, महेश्वरी,
चंदेरी सिल्क आणि सूट आणि कोटा सिल्क, टेम्पल बॉर्डरसह मलबेरी सिल्क, बनारस जमदनी,
हाताने विणलेल्या साड्या आणि सूट असा वैविध्यपूर्ण कपड्यांचा समावेश आहे.
याशिवाय प्रदर्शनात मैसूर सिल्क साड्या, क्रेप आणि जॉर्जेट सिल्क साड्या, शिफॉन सिल्क
साड्या, टस्सर सिल्क साड्या आणि सूट, कांचीपुरम सिल्क साड्या आणि लग्नासाठीच्या खास
साड्या, डिझायनर फॅन्सी साड्या, धर्मावरम् सिल्क साड्या, रॉ सिल्क साड्या आणि टस्सर, ज्यूट
सिल्क साड्या, ढाका सिल्क साड्या, हँडलूम सिल्क कॉटन साड्या, सिल्क ब्लेंड साड्या आणि

स्टोल, सिल्क शाली. सिल्क ब्लेंड फॅब्रिक / फर्निशिंग, उपाडा, गडवाल सिल्क साड्या आणि इतर
अनेक उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यातून ठेवण्यात येत आहेत.
प्रदर्शन 28 फेब्रुवारी 2018 रोजी संपेल. चला तर मग, त्वरा करा, सिल्क एक्स्पो 2018 मधून
सर्वोत्तम क्लासी साड्यांची खरेदी करा.