सिध्देशचा खोर्ली मधून विजय निश्चित:श्रीपाद नाईक

0
318
 गोवा खबरपणजी:केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज खोर्ली मतदारसंघात घरोघरी प्रचार करून भाजपचे उमेदवार सिध्देश नाईक यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
श्रीपाद नाईक यांनी आज कुंभारजुवे गावातील घराघरात जाऊन सिध्देशला विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रचारा दरम्यान पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले,सिध्देशने कुंभारजुवे मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे काम केले आहे.भाजप संघटनेच्या माध्यमातून पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी सिध्देशने पार पाडलेली आहे.त्याचे कार्य बघूनच त्याला उमेदवारी मिळाली आहे.अनेक संघटनांच्या माध्यमातुन तो सक्रिय असतो.त्याच्या प्रचारात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले असून त्याचा विजय निश्चित आहे.
यावेळी बोलताना सिध्देश नाईक म्हणाले,आम्ही घराघरात जाऊन प्रचार करत आहोत.लोक आमची वाट  बघत असतात.भेटल्या नंतर आशीर्वाद देऊन हुरूप वाढवला आहे.23 मार्च रोजी निकाल लागेल त्यात माझा विजय निश्चित असून त्याचे सर्व श्रेय कार्यकर्त्यांना असणार आहे.