सिद्धेश नाईक यांचा कोवॅक्सिनच्या चाचणीत सहभाग

0
363
 गोवा खबर: युवा नेते  आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या  संयुक्त विद्यमाने घेतलेल्या ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत एक स्वयंसेवक म्हणून भाग घेतला.धारगळ- पडणे येथील रेडकर हाॅस्पिटल आणि संशोधन केंद्रात ही चाचणी घेण्यात आली.
एक स्वयंसेवक म्हणून या विधायक कार्याला हातभार लावताना मला अत्यानंद होत असून अधिकाधिक लोकांना अशा कार्यात सहभागी होऊन इतरांनी प्रेरित करावे, असे आवाहन सिद्धेश नाईक यांनी केले.
रेडीकर हाॅस्पिटल आणि संशोधन केंद्रात घेतली जात असलेली कोवॅक्सिन लशीची चाचणी यशस्वी ठरवल्यास कोविड 19 वर लवकर मात करण्यात मदत होईल, अशी आशा वैद्यकीय क्षेत्र बाळगून आहे.