सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या प्रचारासाठी आज गडकरींची सभा

0
1036
गोवा खबर:पणजी पोटनिवडणूक प्रचारासाठी आज सायंकाळी 7 वाजता बोक द व्हाक झरी शेजारील  मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपचे पणजीतील सर्व कार्यकर्ते तसेच भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुकळेकर व भाजपचे सर्व मंत्री आमदार उपस्थित असणार असल्याची माहिती,मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बंगालमधील रोड शो वेळी तृणमुल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा गोवा प्रदेश भाजपतर्फे निषेध करतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री  सावंत यांनी केली आहे.
देशभर सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कार्यकर्त्याची गुंडागर्दी सुरु आहे. तेथील निवडणुकीत भाजपची लाट आली असून अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद मोदी व अन्य नेत्यांच्या सभांना मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे तृणमुलचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून असे भ्याड हल्ले होत आहेत. तेथील निवडणुकीत मोठया प्रमाणात कमळे फुलणार आहेत हे मामता बॅनर्जीना कळून चुकले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष बंगालमध्ये येत असेल तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांची आहे. गुंडागर्दीला आळा घालण्यापेक्षा त्या गुंडांचे समर्थन करतात. बंगालमध्ये चाललेल्या या गुंडागर्दीमुळे तेथील लोकशाही धोक्यात आली आहे. बंगालची जनता ममतांना धडा शिकल्या शिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
ताळगाव येथील कथित बलात्कारप्रकरणी पीड़ित युवती गायब होण्यामागे कुणाचा हात आहे हे सरकार लवकरच जनतेच्या समोर आणणार आहे. यासाठी चौकशीचा आदेश दिला आहे. पोलिस याची सखोल चौकशी करत आहे. लवकरात लवकर सत्य जनते समोर येणार आहे. त्या युवातीला काहीच होणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यामुळे तिला सुरक्षितपणे शोधले जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर व सदानंद तानावडे उपस्थित होते.
राज्यातील 18 खाणींचे लीज हे 2020 पर्यत वैध आहे, त्यामुळे या खाणी लवकरात लवकर सुरु कराव्यात यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खाणी सुरु केल्या जाणार आहेत. राज्यात जे खाणींचे डंप आहेत ते सरकारच्या मालकीचे आहे, त्यामुळे त्याचा योग्य तो निर्णय सरकार घेणार असेही मुख्यमंत्री म्हणाले.