सिंधुदुर्ग विमानतळ पूर्णत्वाच्या जवळ

0
1078

 

 

गोवा खबर:नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात परुळे-चिपी येथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला. या विमानतळ परिसरातील इमारती, धावपट्टी आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून ते पूर्णत्वाच्या जवळ आहे. या विमानतळावर 2500 मीटर लांबीच्या धावपट्टीची तरतूद असून भविष्यात तिच्या विस्ताराचीही तरतूद आहे.

केंद्र सरकारच्या उडान या प्रादेशिक जोडणी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनाही परवडण्यायोग्य दरात हवाई प्रवास करता येईल, असा विश्वास प्रभू यांनी यासंदर्भातल्या बैठकीत व्यक्त केला. या विमानतळामुळे कोकण भाग, महाराष्ट्रातील इतर ठिकाणांशी जोडला जाईल आणि त्याचबरोबर या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनालाही चालना मिळेल, असे ते म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात 3 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत विमानतळ कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या परुळे-चिपी विमानतळासाठी 520 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.