साव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020 – 21 (मालिका V)

0
895

 

गोवा खबर:भारत सरकारची अधिसूचना क्रमांक 4 (4)-बी/(डब्ल्यू अँड एम)/2020 ,  दिनांक 13 एप्रिल 2020 ची साव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020 – 21 (मालिका – V) ची विक्री 03 ते 07 ऑगस्ट 2020 पर्यंत खुली असेल आणि हिशेबाची तारीख 11 ऑगस्ट, 2020 असेल. रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या 31 जुलै 2020 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकात जारी केल्याप्रमाणे, खरेदीच्या कालावधीत या रोख्यांची किंमत प्रति ग्रॅम 5,334 रुपये (रुपये पाच हजार तीनशे चौतीस रुपये मात्र) असेल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमाच्या पद्धतीने पैसे भरतील, त्या गुंतवणूकदारांना  रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने निर्गम किमतीवर प्रतिग्रॅम (पन्नास रुपये फक्त) सवलत देण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या रोख्यांची निर्गम किंमत 5,284 (रुपये पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी) प्रतिग्रॅम असेल.